बॉलिवूडचे असे अनेक रहस्य आहेत जे समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का असतो. बॉलिवूडमध्ये असा एका अभिनेता होऊन गेला. ज्याच्या अंत्यसंस्कारानंतर अभिनेत्याच्या निधनाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली. अभिनेत्याचं शेवटचं दर्शन देखील चाहत्यांना करता आलं नाही. गंभीर आजाराने अभिनेत्याचं निधन झालं. अभिनेत्याला स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागली होती. त्यामुळे अभिनेत्याने शेवटची इच्छा देखील व्यक्त केली.
सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा सुरु आहे, ते अभिनेते दुसरे तिसरी कोणी नाही तर, राजकुमार आहेत. राजकुमार यांनी 3 जुलै 1996 मध्ये अखेरचा श्वास घेतला. कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं होतं. पण त्यांच्या आजाराबद्दल देखील फार कमी लोकांना माहिती होतं. त्यांनी स्वतःचा आजार देखील सर्वांपासून लपवला होता. फक्त त्यांच्या मुलाला त्यांच्या आजाराबद्दल माहिती आहे.
राजकुमार यांनी मुलाला स्पष्टपणे समजावून सांगितलं होतं की, चित्रपटसृष्टीतील कोणालाही कर्करोगाची माहिती नसावी. पण असं म्हणतात ना सत्य कधीच लपत नाही… असंच काही राजकुमार यांच्याबद्दल झालं होतं. त्यांच्या आजाराबद्दल सर्वांना माहिती झालं. पण एक मुलाखतीत त्यांनी रंगाणाऱ्या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं. मी पूर्णपणे ठिक आहे… असं देखील एका मुलाखतीत म्हणाले होते. राजकुमार यांनी स्वतःच्या निधनाबद्दल देखील कोणाला कळू शकलं नाही.
राजकुमार यांना स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागली होती. त्यामुळे पत्नी आणि मुलांसमोर स्वतःची शेवटची इच्छा व्यक्त केली. राजकुमार म्हणाले होते. ‘आजची रात्र देखील मी जगेल की नाही माहिती नाही… मला असं वाटतंय माझ्या सर्व नातेवाईकांना बोलावलं पाहिजे. मृत्यूनंतरच्या विधी पार पडल्यानंतर आणि तुम्ही सगळे घरी आल्यानंतर अन्य लोकांना माझ्या निधनाबद्दल सांगा. मला कोणताही तमाशा नको आहे…’ अशी राजकुमार यांची शेवटची इच्छा होती.
राजकुमारच्या कुटुंबीयांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि तसंच केलं. अभिनेत्याचा मृत्यू झाला तेव्हा कोणालाच त्याची माहिती मिळाली नाही. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतरच लोकांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. राजकुमार आज जिंवत नसले तरी त्यांच्या अनेक आठवणी आजही जिवंत आहेत.