सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड होणार ‘बिग बॉस 18’मध्ये सहभागी, अगोदर अभिनेत्यावर गंभीर आरोप आता थेट…

| Updated on: Aug 19, 2024 | 6:31 PM

बिग बॉस हिंदी सीजन 18 च्या प्रत्येक अपडेटकडे प्रेक्षकांनी नजर आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी पुढे आलीये. मात्र, ही यादी पाहून प्रेक्षक हे चांगलीच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या सीजनमध्ये चक्क सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड देखील सहभागी होतंय.

सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड होणार बिग बॉस 18मध्ये सहभागी, अगोदर अभिनेत्यावर गंभीर आरोप आता थेट...
Follow us on

बिग बॉस सीजन 18 ची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या सीजनची चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळतंय. नुकताच एक यादी बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची व्हायरल होताना दिसली. यामध्ये अनेक नामवंत नावांचाही समावेश आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती बिग बॉस सीजन 18 मध्ये सहभागी होणार आहेत. दरवेळीप्रमाणेच सलमान खान हाच बिग बॉस 18 ला होस्ट करताना दिसेल. बिग बॉसला होस्ट करताना एका वेगळ्याच अंदाजामध्ये सलमान खान हा दिसतो. हेच नाही तर विकेंडच्या वारची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना कायमच दिसतात.

बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची यादी व्हायरल झालीये. या यादीमध्ये एक हैराण करणारे नाव आहे. हे नाव दुसरी तिसरे कोणाचेही नसून चक्क सलमान खान याच्या एक्स गर्लफ्रेंडचे आहे. सलमान खान याने अजूनही लग्न केले नाहीये. अभिनेत्याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलंय. त्यामध्ये ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्यासोबतचे अफेअर अधिकच चर्चेत राहिले.

रिपोर्टनुसार सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली ही देखील बिग बॉस 18 मध्ये दाखल होणार आहे. सोमी अली ही बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याने आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सलमान खान आणि सोमी अली यांनी तब्बल आठ वर्ष एकमेकांना डेट केले. कायमच हे दोघे एकत्र वेळ घालवताना देखील दिसले.

सलमान खान आणि सोमी अली यांनी बुलंद या चित्रपटात एकत्र काम केले. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शितच होऊ शकला नाही. हेच नाही तर सोमी अली हिने सलमान खान याच्यावर काही गंभीर आरोपही केले होते. त्यावेळी या प्रकरणाची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसली. ज्यानंतर सोमी अली आणि सलमान खान यांचे रस्ते वेगळे झाले.

आता तीच सलमान खानची गर्लफ्रेंड थेट बिग बॉसच्या घरात प्रवेश घेणार आहे. सलमान खान आता एक्स गर्लफ्रेंडसोबत बिग बॉसच्या घरात नेमका कसा व्यवहार करणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सलमान खान आणि आपल्या लव्ह स्टोरीबद्दल सोमी अली ही बिग बॉसच्या घरात काही खुलासे करते का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.