मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : अभिनेता सलमान खान नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या सलमान खान याला ‘बिग बॉस’ शोमुळे देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. कायम सिनेमांमुळे चर्चेत असणारा सलमान गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी २’मुळे चर्चेत आहे. १४ ऑगस्ट रोजी ‘बिग बॉस ओटीटी २’ फिनाले आहे. लवकरच शो ऑफएयर होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान ‘बिग बॉस’ शोच्या होस्टची जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे अभिनेता एका एपिसोडसाठी किती मानधन घेतो. याची देखील तुफान चर्चा रंगलेली असते.
सलमान खान ‘बिग बॉस’ शोच्या एका एपिसोडसाठी २५ कोटी रुपये घेतो.. अशी चर्चा तुफान रंगली होती. यावर खुद्द सलमान खान याने स्पष्टीकरण दिलं होतं. एवढंच नाही तर, रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्याचं सलमान खान याने सांगितलं होतं. सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगली आहे.
‘बिग बॉस १६’ दरम्यान सलमान खान म्हणाला होता की, ‘एवढे पैसै मिळत असते तर मी कधी कामच केलं नसतं…’ तेव्हा अभिनेत्याचं वक्तव्य तुफान व्हायरल झालं होतं. आता ‘बिग बॉस ओटीटी २’ फिनाले असल्यामुळे सलमान खान याच्या एका एपिसोडच्या मानधनाची चर्चा रंगत आहे. (salman khan big boss)
सलमान खान याने आतापर्यंत अनेक एका पेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. प्रत्येक सिनेमांमध्ये वेगळ्या भूमिकातून चाहत्यांच्या भेटीस आल्यामुळे अभिनेत्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. त्याचप्रमाणे ‘बिग बॉस’च्या विकेंड का वारच्या प्रतीक्षेत देखील चाहते असतात.
सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
सलमान खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कौफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. सोशल मीडियावर देखील सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.