बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि धमाका करतात. मोठ्या संपत्तीचा मालक सलमान खान आहे. सलमान खानचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले आहे. मात्र, खरी चर्चा रंगली ती म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले. हेच नाहीतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय लग्न करणार असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर अचानक यांचे रस्ते वेगळे झाले आणि ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केले.
ऐश्वर्या राय हिने जरी अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले असले तरीही अजूनही सलमान खान याने लग्न केले नाहीये. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, ऐश्वर्या राय हिच्या अगोदर एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात सलमान खान होता. सलमान खान याने स्वत:च याबद्दलचा खुलासा केला. हेच नाहीतर त्या अभिनेत्रीच्या वडिलांना देखील सलमान खान लग्नाबद्दल बोलला होता.
सलमान खान याने याबद्दलचा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला. सलमान खान हा अभिनेत्री जुही चावलाच्या प्रेमात होता. सलमान खान याने मुलाखतीमध्ये म्हटले की, जुही खूप जास्त सुंदर आहे. मी तिच्या वडिलांना विचारले होते की, तुम्ही माझे लग्न तिच्यासोबत करणार का? परंतू, मला हे माहिती होते की, त्यांच्या मनात नेमके काय आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बोलताना सलमान खान हा चक्क निराश होताना देखील दिसत आहे. तसा सलमान खान याचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ जुनाच आहे. सलमान खान आणि जुही चावला यांनी एकाच चित्रपटात एकसोबत काम केले. ज्यामध्ये सलमान खान याचा केमिओ होता. आता सलमान खानच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
जुही चावला हिने व्यावसायिक जय मेहता याच्यासोबत लग्न केले. दोन मुलेही चुही चावला हिला आहेत. सलमान खान 58 वयाचा असूनही त्याने आतापर्यंत लग्न केले नाहीये. दुसरीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दलही विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असून ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर बच्चन कुटुबियांपैकी कोणीच काहीच भाष्य केले नाहीये.