मुंबई : बॉलीवूडचा टायगर सलमान खानच्या (Salman Khan) अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसचे (Salman Khan Panvel Farm House) शेजारी सलमानवर वारंवार वेगवेगळे गंभीर आरोप करत आहेत. आताही त्यांनी सलमान खानच्या फार्म हाऊसवर कलाकारांचे मृतदेह पुरले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसंच सलमानच्या या फार्म हाऊसवरून लहान मुलांची तस्करी केली जात असल्याचंही म्हटलंय. टाईम्स ग्रुपने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
सलमानवरचे आरोप काय आहेत?
अभिनेता सलमान खान सध्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमानचा पनवेलला फार्म हाऊसही आहे. या फार्म हाऊसवर सलमान नेहमी जात असतो. सलमानच्या पनवेलमधल्या फार्म हाऊसच्या शेजारी मालाडमधले कक्कड या गृहस्थांचे देखील फार्म हाऊस आहे. त्यांनी सलमानवर गंभीर आरोप केले आहेत. सलमानच्या या फार्म हाऊसवर कलाकारांचे मृतदेह पुरले जातात तसंच या फार्म हाऊसवरून लहान मुलांची तस्करी केली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सलमानची बाजू
सलमान खानची बाजू या प्रकरणी काय आहे हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे. सलमान खानचे वकील प्रदीप गांधी यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. सलमानच्या प्रतिमेला इजा पोहोचवण्यासाठी हे सगळं जातंय, असं प्रदीप गांधी म्हणाले आहेत.
सलमान खानचं पनवेल मधलं फार्म हाऊस
पनवेलमध्ये सलमानचं ‘अर्पिता फार्म्स’ नावाचं फार्म हाऊस आहे. 150 एकरमध्ये पसरलेलं हे फार्म हाऊस त्याच्या बहिणीच्या नावावर आहे. सलमान नेहमी या फार्म हाऊसवर जात असतो. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी याच फार्म हाऊसवर तेव्हा त्याला साप चावल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमान खानला मुंबई दिवाणी न्यायालयाने झटका दिला. सलमान खानने त्याच्या शेजाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश द्यायला न्यायालयाने नकार दिला.
सलमानची तक्रार काय आहे?
सलमानने आपल्या शेजाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. कक्कड या शेजाऱ्यांनी आपली बदनामी केल्याचा सलमानचा आरोप आहे. कक्कड यांनी काही दिवसांपूर्वी युट्यूबवर मुलाखत दिली होती. यावेळी कक्कड यांनी आपल्याबद्दलची खोटी माहिती दिली. त्यामुळे आपल्या प्रतिमेला इजा पोहोचल्याचं सलमानचं म्हणणं आहे.
संबंधित बातम्या