बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून संजय दत्तचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही संजय दत्त चांगलाच सक्रिय दिसतो. संजय दत्तचा चाहतावर्गही मोठा आहे. फक्त अभिनयच नाही तर संजय दत्तचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिले आहे. नुकताच आता संजय दत्त याने यूकेचा व्हिसा रद्द होण्याच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. फक्त हेच नाही तर याबद्दल त्याने काही मोठे खुलासे देखील केले आहेत. यूकेचा व्हिसा रद्द झाल्याने ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाच्या शूटिंगपासून दूर राहण्याचीही वेळ त्याच्यावर आलीये. आता संजय दत्त याच्या खुलाशानंतर चाहते हे यूकेच्या सरकार विरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
संजय दत्त म्हणाला की, मुळात म्हणजे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी जे गेले ते अत्यंत चुकीचे आहे. मला सुरूवातीला व्हिसा हा देण्यात आला. व्हिसा मिळाल्यामुळे तिथे माझे सर्व बुकिंग आणि प्लनिंग केले गेले. त्यानंतर त्यांंनी एका महिन्यानंतर माझा व्हिसा हा रद्द केला. मी त्यांना माझी सर्व आवश्यक असलेली कागदपत्रे दिली होती. जर त्यांना मला व्हिसा द्यायचा नव्हता तर पहिल्यांदा का दिला?
त्यांना त्यांच्या देशातील सर्व नियम हे व्हिसा दिल्यानंतर एक महिन्याने आठवले. मला वाटत नाही की, माझ्याकडून काही राहिले आहे. त्या ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी जे केले ते चुकीचे आहे. मुळात म्हणजे मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मी फक्त माझ्याच नाही तर मी प्रत्येक देशाच्या कायद्याचे पालन करतो. त्यामुळेच मला हे समजू शकले नाही की, हे सर्व का घडले.
संजय दत्त याने केलेल्या या खुलाशानंतर ब्रिटिश सरकारवर लोक भडकले आहेत. संजय दत्त याला व्हिसा नाकारण्याचे कारण तसे जुने आहे. हे सर्व प्रकरण 31 वर्षे जुन्या प्रकरणाशी संबंधित आहे. 1993 मध्ये संजयला टाडा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. मुंबई बॉम्बस्फोटातील इतर आरोपींकडून खरेदी केलेली बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल नंतर शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले.
हेच नाही तर यामुळेच त्याला काही वर्ष जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली. 2016 मध्ये संजय दत्त याने आपली शिक्षा पुर्ण केली. जेलची शिक्षा पूर्ण केल्यानंतर संजय दत्त हा चित्रपटांमध्ये परत एकदा सक्रिय झालाय. आता त्या प्रकरणामुळेच संजय दत्तला व्हिसा नाकारण्यात आलाय. मात्र, या प्रकरणानंतर संजय दत्त याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड असा संताप बघायला मिळतोय.