Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त वयाच्या 65 व्या वर्षी देखील मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. आजही अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. संजूबाबाने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेता फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला. संजूबाबाने एक – दोन नाही तर तीन लग्न केली. आता अभिनेता तिसरी पत्नी मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण, एक कळा असा देखील होता जेव्हा अभिनेत्याने चौथ्या लग्नाची इच्छा व्यक्त केली होती.
सध्या संजूबाबाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता चौथ्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. ‘तुला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायला आवडेल?’ असा प्रश्न अभिनेत्याला विचारण्यात येतो.
यावर अभिनेता म्हणतो, ‘मला माधुरी दीक्षित हिच्यासोबत लग्न करायला आवडेल…’ शिवाय अभिनेता हसतो देखील. व्हिडीओ जुना असला तरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, चाहत्यांमध्ये देखील माधुरी आणि संजूबाबा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.
माधुरी – संजय यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. पण 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ सिनेमानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणादरम्यान घरात बेकायदेशीर शस्त्रे ठेवल्याबद्दल संजय दत्तचे नाव पुढे आले होते, त्यानंतर माधुरीने अभिनेत्यापासून स्वतःला दूर केलं. त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
संजूबाबाच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, तिचं नाव ऋचा शर्मा असं होतं. ऋचा हिचं निधन कर्करोगामुळे झालं. ऋचा आणि संजय यांना एक मुलगी देखील आहे. आता अभिनेत्याची लेक त्रिशाला दत्ता परदेशात तिच्या आजी – आजोबांसोबत राहते…
अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, संजूबाबाने तुरुंगातून सुटल्यानंतर दुसरं लग्न रिया पिल्लाईसोबत केलं. पण दोघांचं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्याने तिसरं लग्न मान्यता दत्त हिच्यासोबत केलं. आता अभिनेता तिसऱ्या पत्नीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.