देह विक्रीच्या व्यवसाय करणाऱ्या महिलेसोबत संजय दत्त याचे खास कनेक्शन! जाणून व्हाल थक्क

| Updated on: Jan 13, 2024 | 2:01 PM

sanjay dutta : देह विक्रीच्या व्यवसाय करणाऱ्या महिलेसोबत संजय दत्त याचं कनेक्शन जाणून व्हायल थक्क, कोण होती 'ती' महिला?... संजय दत्त याच्या आईचं देखील देह विक्रीच्या व्यवसाय करणाऱ्या महिलेसोबत खास कनेक्शन...

देह विक्रीच्या व्यवसाय करणाऱ्या महिलेसोबत संजय दत्त याचे खास कनेक्शन! जाणून व्हाल थक्क
Follow us on

मुंबई | 13 जानेवारी 2024 : अभिनेता संजय दत्त याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. संजय दत्त याने एक नाही तर, तीन लग्न केली. सध्या अभिनेता तिसऱ्या पत्नीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण संजूबाबा याच्या आजीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. संजय दत्त याच्या आजीचं नाव जद्दनबाई असं होतं. रिपोर्टनुसार, तेव्हा जद्दनबाई देहविक्रीचा व्यवसाय करायच्या… जद्दनबाई यांना एक मुलगी होती आणि त्यांच्या मुलीचं नाव होतं नर्गीस… नर्गिस यांना डॉक्टर व्हायचं होतं. पण आपल्या मुलीने प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री व्हावं अशी जद्दनबाई यांची इच्छा होती. अभिनेत्री नर्गिस यांनी आईची इच्छा पूर्ण देखील केली.

आईने सांगितल्यामुळे नरगीस यांनी मेहबूब खान यांना ऑडिशन दिली. त्यांनी आपली निवड करु नये अशी नरगीस यांची इच्छा होती. पण नरगीस यांचा अभिनय पाहून महबूब खान प्रचंड आनंदी झाले आणि ‘तकदीर’ सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून नरगीस यांची निवड केली.

अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली आणि चाहत्यांच्या मनात घर केलं. तेव्हा बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत नर्गिस अव्वल स्थानी होत्या. करियर यशाच्या शिखरावर असताना नर्गिस यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.

झगमगत्या विश्वाचा निरोप घेतल्यानंतर नर्गिस यांनी अभिनेते सुनील दत्त यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर नर्गीस यांनी पूर्ण लक्ष कुटुंबाकडे केंद्रीत केलं. रिपोर्टनुसार, काही वर्षांनंतर नर्गीस यांनी अभिनय विश्वात पुन्हा पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. पण वयाच्या 51 व्या वर्षी नर्गिस कर्करोगाच्या विळख्यात अडकल्या. कर्करोगामुळे नर्गिस यांचं निधन झालं.

अभिनेता संजय दत्त याची आई म्हणजे नरगीस… नरगीस यांचं निधन कर्करोगामुळे झालं. आज नरगीस जिवंत नसल्या तरी त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांसोबत आणि कुटुंबियांसोबत आहेत. संजय दत्त देखील कायम आईबद्दल सांगत असतो. संजय दत्त कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्याबद्दल सांगत असतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे…