सैफ अली खान याची लेक सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान हिचे चित्रपट धमाका करताना देखील दिसतात. सारा अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सारा अली खान ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. मात्र, असे असतानाही एकदम साधी लाईफ जगताना सारा अली खान ही कायमच दिसते. सारा अली खान ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चांगलीच चर्चेत असते.
सारा अली खान हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय. सारा अली खान म्हणाली की, मी एकदा माझ्या आई वडिलांसोबत शाॅपिंगसाठी गेले होते. त्यावेळी ते एका दुकानात खरेदीसाठी गेले. त्यानंतर मी आमच्या हाउस हेल्परसोबत बाहेरच थांबले होते. हाउस हेल्परसोबत मी रस्त्यावरच डान्स करण्यास सुरूवात केली.
मी डान्स करण्यास सुरूवात केल्यानंतर लोक पैसे टाकत होते. मला वाटले की, अरे वा..आपल्याला डान्स केल्यामुळे पैसे मिळत आहेत, मग मी डान्स सुरूच ठेवला. त्या हाउस हेल्परने माझ्या आई वडिलांना सांगितले की, सारा डान्स करत आहे आणि लोक तिला पैसे देत आहेत. क्यूट दिसत असल्याने लोक पैसे देत असल्याचे त्या हाउस हेल्परला वाटले.
आई म्हणाली, क्यूट दिसत असल्याने नाही तर भिकारी दिसत असल्याने लोक पैसे देत आहेत. सारा अली खान हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. सारा अली खान ही नेहमीच मोठे खुलासे करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये रिक्षाने प्रवास करताना देखील सारा अली खान ही दिसली होती.
अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची लेक सारा अली खान आहे. सारा अली खान हिने केदारनाथ चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे सारा अली खान हिचा हा चित्रपट हिट ठरला. सारा अली खान ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सारा अली खान ही दिसते.