मुंबई | 28 जुलै 2023 : रोमान्सचा बादशाहा अशी देखील अभिनेता शाहरुख खान याची ओळख आहे. शाहरुख खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. लव्हस्टोरीवर अधारलेल्या सिनेमांमध्ये देखील उत्तम अभिनय करत शाहरुख खान याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. म्हणून किंग खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील किंग खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शाहरुख खान फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही तर, त्याच्या ‘लव्हस्टोरी’मुळे देखील चर्चेत असतो. गौरी आणि शाहरुख खान यांच्या लव्हस्टोरीबद्दल सर्वांना माहिती आहे. पण गौरी हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी शाहरुख खान याने स्वतःचं नाव बदललं होतं, हे सत्य फार कमी लोकांना माहिती आहे.
शाहरुख खान आणि गौरी यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते… आजही दोघे चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. दोघांनी धर्माची भिंत ओलांडून आंतरजातीय विवाह केला. पण लग्नादरम्यान किंग खान याला स्वतःचं नाव बदलावं लागलं. शाहरुख खान गौरीसोबत हिंदू रितीरिवाज आणि परंपरेनुसार लग्न करणार होता, तेव्हा अभिनेत्याने स्वतःचं मुस्लिम नाव बदलून स्वतःचं नाव ‘जितेंद्र कुमार तुल्ली’ ठेवलं होतं.
शाहरुखच्या जीवनावर आधारित मुस्ताक शेख यांच्या पुस्तकानुसार, किंग खानने लग्नाच्या वेळी स्वतःचे नाव जितेंद्र कुमार तुल्ली ठेवले होते आणि या नावाने जितेंद्र आणि राजेंद्र कुमार या दोन जुन्या स्टार्सना अभिनेत्याला ट्रिब्यूट द्यायचं होतं. महत्त्वाचं म्हणजे फक्त शाहरुख खान यानेच नाही तर, गौरी देखील किंग खान याच्यासोबत लग्न करण्यासाठी स्वतःचं नाव बदललं होतं.
शाहरुख खान याच्यासोबत लग्न करण्यासाठी गौरी हिने स्वतःचं नाव आयेशा असं ठेवलं होतं… दोघांनी हिंदू आणि मुस्लिम पद्धतीत लग्न केलं, पण शाहरुख – गौरी यांनी कोर्टमॅरिज देखील केलं होतं. गौरी आणि शाहरुख यांच्या नात्यासाठी गौरीच्या आई-वडिलांचा विरोध होता. पण दोघांच्या प्रेमासमोर गौरीच्या आई – वडिलांना हार मानावी लागली. अखरे १९९१ मध्ये दोघांनी लग्न केलं.
लग्नानंतर देखील दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. पण दोघांचं नातं कधीही तुटलं नाही. गौरी आणि शाहरुख यांना तीन मुलं आहेत. आर्यन खान, सुहाना खान, अबराम खान असं किंग खान याच्या मुलांची नावे आहेत. किंग खान कायम सोशल मीडियावर पत्नी आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.