बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष अत्यंत खास ठरले. 2023 मध्ये त्याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसले आणि त्या चित्रपटांनी मोठा धमाका केला. 2018 मध्ये झिरो चित्रपट रिलीज झाला आणि तो फ्लॉप गेला त्यानंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यापासून गायबच होता. शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केलंय. मात्र, सुहानाच पहिलाच चित्रपट फ्लॉप गेला. सुहाना खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. ती सतत आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
सुहाना खान ही वडील शाहरुख खान यांच्या किंग चित्रपटात दिसणार आहे. बाप लेकीची जोडी धमाका करताना दिसले. किंग चित्रपटासाठी सुहाना खान ही चांगलीच मेहनत घेताना दिसतंय. सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान हिचे काही फोटो आणि व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहेत. सुहाना वर्कआऊट करताना दिसत आहे.
सुहाना खान ही जिममध्ये चांगलाच घाम गाळताना दिसत आहे. आता लोक सुहानाच्या व्हिडीओ आणि फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने म्हटले की, दुसराही चित्रपट फ्लॉप न जाऊ देण्यासाठी सुहाना मेहनत घेत आहे. दुसऱ्याने लिहिले की, आता वाटत आहे शाहरुख खानची लेक.
तिसऱ्याने लिहिले की, स्टार किड्ससाठी काही गोष्टी किती सोप्पा असतात ना. अजून एकाने लिहिले की, सुहाना खरोखरच मेहनत घेताना दिसत आहे. सुहाना खान हिला बऱ्याच जाहिराती देखील मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानसोबत एका पुरस्कार सोहळ्यासाठी देखील सुहाना पोहोचली होती.
शाहरुख खान आणि गाैरी खान हे लेक सुहाना हिला सपोर्ट करताना दिसतात. सुहानाने शेअर केलेल्या फोटोवर कायमच शाहरुख खान हा कमेंट करतो. सुहाना खान आणि अनन्या पांडे या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. एका मुलाखतीमध्ये अनन्या पांडे हिने सांगितले की, तिच्याकडून एकदा चुकून सुहानाचा नंबर लीक झाला होता.