बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खानची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. शाहरुख खानने बाॅलिवूडमध्ये धमाका केलाय. शाहरुख खान हा कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे. काल आयपीएल मॅच पाहण्यासाठी शाहरुख खान हा अहमदाबादमध्ये पोहचला होता. यावेळी मैदानावर त्याच्या टीमने मॅच जिंकल्यानंतर प्रेक्षकांचे आभार मानता देखील शाहरुख खान दिसला. मात्र, आज अचानक शाहरुख खान याला रूग्णालयात दाखल केले. शाहरुख खान याला ऊन लागल्याने त्रास होत होता आणि त्याला थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.
शाहरुख खान याला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शाहरुख खान याला रूग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी केडी रूग्णालयाची सुरक्षा वाढवली आहे. शाहरुख खान याला रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची पत्नी गाैरी खान ही लगेचच रूग्णालयात पोहचलीये. गाैरी खान ही शाहरुख खानची काळजी घेत आहे.
हेच नाही तर जुही चावला ही देखील रूग्णालयात आहे. शाहरुख खान याला डिहायड्रेशन आणि खोकल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले. दुपारपासूनच शाहरुख खान याला त्रास होण्यास सुरूवात झाली. सध्या शाहरुख खानची तब्येत व्यवस्थित असल्याचेही सांगितले जातंय. मात्र, शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय.
अहमदाबादमध्ये खूप जास्त ऊन आहे. पारा 43 डिग्री आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा सामना पाहण्यासाठी शाहरुख खान आला होता. विशेष म्हणजे शाहरुखचा टीम कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरीत गाठलीये.
2023 हे वर्षे शाहरुख खान याच्यासाठी खूप जास्त लकी ठरले. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली. शाहरुख खान हा सोशल मीडियावरून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. शाहरुख खान सोशल मीडियावर सक्रिय देखील आहे.