बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे दोघांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. शाहरुख खान आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड असे प्रेमही दिले. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वी डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी लकी ठरले. 2018 नंतर शाहरुख खान हा बॉलिवूड चित्रपटांमध्ये परत एकदा धमाका करताना दिसला. दुसरीकडे सलमान खान याचेही चित्रपट धमाके करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला.
बिग बॉसच्या मंचावर काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान हा पोहोचला. यावेळी शाहरुख खान याने एक मोठा खुलासा केला. शाहरुख खान हा ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या सेटवरील किस्सा सांगताना दिसला. करण अर्जुन चित्रपटामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबतच ममता कुलकर्णी ही देखील मुख्य भूमिकेत होती.
चित्रपटात या तिघांचे एक गाणे होते. मात्र, या गाण्याच्या शूटिंगवेळी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्याकडून अनेक चूका होत होत्या. यामुळे सतत रिटेक घ्यावे लागत होते. शाहरुख खान म्हणाला की, गाण्याच्या शूटिंगनंतर मी आणि सलमान बसलो होतो. यावेळी ममता ही आमच्याकडे पाहून शिट्टी वाजवून बोलावताना दिसली.
मला आणि सलमानला वाटले की, ही आम्हाला असे नाही बोलावणार. मात्र, परत तिने शिट्टी वाजवत आमच्याकडेच हात केला. मग आम्ही दोघे ममताकडे गेलो. ती आम्हाला अगदी स्पष्टपणे सांगताना दिसली की, तुम्ही रिहर्सल करायला या कारण तुमच्या स्टेप्स अजिबात चांगल्या नाहीत. तुम्ही दोघेही खूप खराब करत आहात.
ममता कुलकर्णीचे बोलणे ऐकून सलमान खान आणि शाहरुख खान यांनी तब्बल पहाटे पाच वाजेपर्यंत गाण्याची रिहर्सल केली. विशेष म्हणजे आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीचे ऐकून सलमान खान आणि शाहरुख खान यांनी पाचपर्यंत रिहर्सल केली. विशेष म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान यांचा करण अर्जुन हा चित्रपट सुपरहिट ठरला.