जेव्हा वाटतं सर्व… तेव्हाच जिंदगी कानशिलात लगावते, शाहरुख खान असं का म्हणाला?; आर्यनशी काय संबंध?

| Updated on: Jan 11, 2024 | 1:49 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटांनी मोठा धमाका नक्कीच केला.

जेव्हा वाटतं सर्व... तेव्हाच जिंदगी कानशिलात लगावते, शाहरुख खान असं का म्हणाला?; आर्यनशी काय संबंध?
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्षे अत्यंत खास गेले. विशेष म्हणजे 2023 मध्येच शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटांनी धमाका केला. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेला आणि शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शेवटी 2023 मध्ये त्याने पठाण चित्रपटातून पर्दापण केले आणि त्याचा चित्रपट सुपरहिट ठरला.

शाहरुख खान याच्या आयुष्यामध्ये 2022 मध्ये अत्यंत मोठे वादळ आले. शाहरुख खान याचा लेक आर्यन खान याच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. फक्त आरोपच नाही तर आर्यन खान याला अनेक महिने जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली. अनेकांनी यादरम्यान शाहरुख खान यालाच खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली.

ड्रग्सच्या प्रकरणात आर्यन खान याचे पाय खोलात दिसले. यादरम्यान शाहरुख खान याने काहीच भाष्य केले नाही. पहिल्यांदाच आर्यन खान याच्या ड्रग्सच्या प्रकरणावर जाहिरपणे बोलताना शाहरुख खान हा दिसला आहे. शाहरुख खान म्हणाला की, तो काळ सर्वात वाईट आणि परिशान करणारा होता. शाहरुख खान म्हणाला, या वाईट काळात मी आणि माझ्या कुटुंबियांनी काही गोष्टी नक्कीच शिकल्या आहेत.

शाहरुख खान म्हणाला, गप्प शांत राहिला पाहिजे, खूप जास्त शांत राहून कठोर मेहनत करायला पाहिजे. जेंव्हा आपल्याला वाटते की, सर्वकाही व्यवस्थितपणे सुरू आहे तेंव्हाच जिंदगी आपल्या कानशिलात लगावते. पहिल्यांदाच आर्यन खान याच्या वादावर असे जाहिरपणे बोलताना शाहरुख खान हा दिसला आहे. शाहरुख खान याने सांगितले की, त्यावेळीचा काळ किती जास्त वाईट होता.

शाहरुख खान याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या चित्रपटांनी मोठा धमाका केला. शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने देखील नुकताच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करण्यास सुरूवात केलीये. मात्र, सुहाना खान हिच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचे फार जास्त प्रेम हे नक्कीच मिळाले नाहीये.