मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी केली. पठाणनंतर आता शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहरुख खान हा दिसत आहे.
शाहरुख खान याचा जवाननंतर लगेचच डंकी हा चित्रपट रिलीज होईल. विशेष म्हणजे शाहरुख खान हा त्याच्या आगामी जवान हा चित्रपटाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला.
शाहरुख खान याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाचे आतुरतेने वाट पाहत आहेत. जवान हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहचलाय. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरही शाहरुख खान हा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेला होता. ज्याचे काही व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.
आता नुकताच जवानच्या रिलीजच्या अगोदरही तो वैष्णोदेवी मंदिरात पोहचला. शाहरुख खान याचे वैष्णोदेवी मंदिरात जातानाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख खान याने निळ्या रंगाची हुडी घातल्याचे दिसत आहे. यावेळी शाहरुख खान हा आपला चेहरा लपवताना देखील दिसत आहे.
आता शाहरुख खान याच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. शाहरुख खान याला जवान या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन हे केले आहे. शाहरुख खान याचा 2019 मध्ये झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेला.
झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. त्यानंतर त्याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि आता जवान हा चित्रपट रिलीज होतोय. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा परत बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार की, नाही या प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता.