शाहरुखा खानला बुधवारी उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता किंग खानची प्रकृती देखील स्थिर आहे. अहमदाबादच्या केडी रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार सुरु होते. आता अभिनेत्याला डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहरुख मुंबईत परतला आहे. सांगायचं झालंतर, गुरुवारी संध्याकाळी शाहरुख खानची मॅनेजरने अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली. त्यानंतर अभिनेत्याला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेता थेट मुंबईतील ‘मन्नत बंगल्यात’ पोहोचला.
शाहरुख खान प्रायव्हेट विमानाने अहमदाबादहून मुंबईत पोहोचला. शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होत होता. हॉटेलवर करण्यात आलेल्या प्राथमिक उपचारानंतरही किंग खानच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्याचा पहिला फोटो समोर येत आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफार विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शाहरुख खानचा फाटो पोस्ट केला आहे. अभिनेत्याला उन लागू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी छत्री पकडली आहे. फोटोमध्ये किंग खानसोबत पत्नी गौरी खान देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शहरुख खाानच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच गौरी केडी रुग्णालयात पोहोचली. अभिनेत्री जुही चावला देखील किंग खानची विचारपुस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचली.
उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने शाहरुख खानला बुधवारी संध्याकाळी 4 वाजता अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. टीम कोलकाता नाईट रायडर्सला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख अहमदाबादला पोहोचला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा सामना पाहण्यासाठी शाहरुख खान आला होता. किंग खान अहमदाबादच्या ITC नर्मदा हॉटेलमध्ये थांबला.
अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती समोर येताच चाहत्यांना देखील दिलासा मिळाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा रंगली आहे. किंग खानच्या सिनेमांबद्दल सांगायचा झालं तर, अभिनेता ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच शाबरुख यांच्यासोबत लेक सुबाना खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.