मुंबई : 24 सप्टेंबर 2023 | बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांच्या माध्यमातून शाहीद चाहत्यांच्या भेटीस आला आणि लोकप्रिय झाला. शाहीद याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. म्हणून अभिनेत्याच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. शाहीद देखील त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्याबद्दल कायम चाहत्यांना महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो. एवढंच नाही तर शाहीद कायम त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत असतो.
सोशल मीडियावर देखील अभिनेता पत्नी आणि दोन मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. शाहीद मुलीचे फोटो जास्त शेअर करत नाही, पण अभिनेत्याची पत्नी मीरा कायम सोशल मीडियावर मुलीसोबत फोटो पोस्ट करत असते. शाहीद आणि मीरा यांच्या मुलीचं नाव मीरा कपूर असं आहे.
इतर स्टारकिड प्रमाणे मीशा देखील लोकप्रिय स्टारकिड आहे. सोशल मीडियावर शाहीद हिच्या लेकीचे देखील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र शाहीद आणि मीरा यांच्या लेकीची चर्चा रंगली आहे.
मीशाचा जन्म २६ ऑगस्ट २०१६ मध्ये झाला. मीशा आता सात वर्षांची आहे. मीडिया रिपोर्टनुसार मीशा मुंबईतील धीरुबाई अंबानी शाळेत शिक्षण घेत आहे. मुंबईतील नाववंत शाळांपैकी एक म्हणजे अंबानी स्कूल. नीता अंबानी यांनी २००३ मध्ये शाळेची स्थापना केली.
अंबानी स्कूलमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची मुलं शिक्षण घेतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि शाहरुख खान याचा लहान मुलगा अबराम देखील अंबानी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. अंबानी स्कूलमध्ये अनेक सेलिब्रिटींची मुलं शिक्षण घेतात.
मीडिया रिपोर्टनुसार, धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल देशातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे. एवढंच नाही तर, मिळालेल्या माहितीनुसार, धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीपर्यंत फी १ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.
धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ११ वी आणि १२ वी इयत्तेची फी ९.६५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. ८ वी ते १० वी इयत्तेची (ICSE) फी १ लाख ८५ हजार रुपये आहे. तर ८ वी ते १० वी इयत्तेची (IGCSE) फी 5 लाख 9 हजार रुपये असल्याची माहिती मिळत आहे.