Shahid Kapoor | शाहिद कपूर याच्या निशाण्यावर अक्षय कुमार? अभिनेत्याने केले मोठे भाष्य

| Updated on: Oct 16, 2023 | 5:42 PM

शाहिद कपूर याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शाहिद कपूर याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहिद कपूर याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या.

Shahid Kapoor | शाहिद कपूर याच्या निशाण्यावर अक्षय कुमार? अभिनेत्याने केले मोठे भाष्य
Follow us on

मुंबई : शाहिद कपूर आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. दोघांचीही सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अक्षय कुमार हा असा एकमेव बाॅलिवूड (Bollywood) स्टार आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट (Movie) हे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट काही खास धमाका करताना अजिबात दिसत नाहीयेत. अक्षयचे एका मागून एक चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे शाहिद कपूर हा प्रचंड चर्चेत आहे. शाहिद कपूर याला मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, तुम्ही काही निवडक चित्रपटांमध्येच काम का करता? यावर थेट शाहिद कपूर हा म्हणाला की, मलाही असे वाटते की, मी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करावे. मात्र, मला मिशी चिटकून कितीही चित्रपटांमध्ये काम करायचे नाहीये.

मी जे काही देणार ते बेस्टच असावे. मी एका वर्षामध्ये दोन चित्रपटांमध्ये काम करतो आणि त्याला जास्तीत जास्त वेळ देण्याचा देखील प्रयत्न करतो. पुढे शाहिद कपूर हा म्हणाला की, मला पैसे कमवायचे आहेत, चल जाऊया, असा विचार करून मी चित्रपटाच्या सेटवर कधीच जाऊ शकत नाही. हे मला कधीच करणे देखील शक्य होणार नाही.

कारण दिवसाच्या शेवटी तुम्ही माणूस आहात, तुम्हाला जाऊन काम करावे लागेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आधार घ्यावा लागेल. परंतु त्याच वेळी तुम्हाला निवडक राहणे देखील महत्वाचे आहे. आता शाहिद कपूर याचे हे विधान ऐकून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. शाहिद कपूर याने अक्षय कुमार याला टोमणा मारल्याचे देखील सांगितले जातंय.

शाहिद कपूर याचे हे बोलणे ऐकून अनेकांनी थेट म्हटले की, हा अक्षय कुमार याला मारलेला टोमणाच आहे. शाहिद कपूर हा कायमच चर्चेत असतो. शाहिद कपूर याने काही दिवसांपूर्वीच वरळीमध्ये अत्यंत आलिशान असे घर खरेदी केले. याच घरात सध्या शाहिद कपूर हा आपल्या कुटुंबासोबत राहतो. शाहिद कपूर हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत ही देखील सोशल मीडियावर सक्रिय असते.