मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील किंग खान याच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड मोठी आहे. पण शाहरुख खान फक्त ६ जणांना फॉलो करतो. त्या ६ जणांमध्ये अभिनेत्याचं कुटुंब आणि मॅनेजर पूजा ददलानी देखील आहे. पूजा ददलानी गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुख खान याच्यासाठी काम करते. एवढंच नाही तर, अभिनेत्याच्या चांगल्या – वाईट काळात देखील पूजा कायम खान कुटुंबासोबत असते. शाहरुख खान याच्या व्यस्त वेळापत्रकाचं नियोजन पूजा करते. किंग खान याच्या अनेक कांमाची जबाबदारी पूजा हिच्यावर असते. शाहरुख खान बॉलिवूडचा फक्त अभिनेता नसून प्रसिद्ध उद्योजक देखील आहे.
बॉलिवूड आणि उद्योगांच्या माध्यमातून किंग खान कोट्यवधी रुपये कमावतो. फक्त किंग खान नाही तर, अभिनेत्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील कोट्यवधी रुपये कमावते. तर आज पूजा ददलानी हिच्या संपत्तीबद्दल जाणून घेवू. किंग खान याची मॅनेजर पूजा देखील अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
पूजा ददलानी २०१२ पासून अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी काम करते. किंग खान याच्या मॅनेजरची महिन्याची कमाई जवळपास ८ कोटी आहे. म्हणजे पूजा हिचं महिन्याचं मानधन ६६ लाख रुपये आहे. पूजा कायम तिच्या लाईफ स्टाईलमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर पूजा कायम तिच्या मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
पूजा ददलानी तिच्या सोशल मीडियावर किंग खान याच्या आगामी सिनेमांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर पूजा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तर किंग खान लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
7 सप्टेंबर रोजी किंग खान ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहेत. किंग खान सोशल मीडियावर सिनेमाबद्दल अपडेट पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. ‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर ‘जवान’ सिनेमाला चाहते किती प्रेम देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.