चुकीचा निर्णय घेतला, प्रचंड पश्चाताप होतोय, खासदार शत्रुघ्न सिन्हा गहिवरले, का म्हणाले असे?

| Updated on: Feb 24, 2024 | 8:20 PM

बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे कायमच चर्चेत असतात. शत्रुघ्न सिन्हा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच आता हैराण करणारा खुलासा हा केलाय. तसेच त्यांना मोठा पश्चाताप होत असल्याचे सांगितले.

चुकीचा निर्णय घेतला, प्रचंड पश्चाताप होतोय, खासदार शत्रुघ्न सिन्हा गहिवरले, का म्हणाले असे?
शत्रुघ्न सिन्हा
Follow us on

मुंबई : अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचे चित्रपट नेहमीच धमाका करताना दिसले. अनेक हिट चित्रपट शत्रुघ्न सिन्हा यांनी दिले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठा चाहता वर्ग आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये थेट मोठा खुलासा हा केलाय. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली चूक देखील मान्य केल्याचे सांगितले. हेच नाही तर त्या एका निर्णयाचा आजही आपल्याला पश्चाताप होत असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून सांगण्यात आलंय.

शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की, ‘शोले’ चित्रपटासाठी त्यांची खूप जास्त वाट बघितली गेली. परंतू त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे ते हे चित्रपट करू नाही शकले. फक्त हेच नाही तर दीवार आणि शोर चित्रपटांना देखील त्यांनी नकार दिला. ज्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्याऐवजी अमिताभ बच्चन यांना कास्ट करण्यात आले आणि त्यांचे हे चित्रपट सुपरहिट ठरले.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, मला शोले चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या रोलची आॅफर होती. रमेश सिप्पी यांनी याबाबतचा खुलासा हा त्यांच्या पुस्तकामध्ये देखील केलाय. मुळात म्हणजे मी त्यावेळी खूप सारे चित्रपट करत होतो, यामुळे मी शोलेसाठी वेळ देऊ शकत नव्हतो. माझे शेड्यूल हे खूप जास्त बिझी होते. शोलेसाठी माझी वाट बघितली गेली.

रमेश सिप्पी यांना वाटत होते की, मी शोलेसाठी डेट जाहिर करावी. जे होऊ शकले नाही. मला खरोखरच वाटते की, मी तो चित्रपट करायला हवा होता. मी अमिताभ बच्चन यांच्यासाठी नक्कीच खुश आहे. कारण शोलेमुळे त्यांना इतका मोठा ब्रेक मिळाला. ते नॅशनल आयकॉन बनले. हेच नाही तर शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांना थेट नकार दिला.

पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, दीवार चित्रपटाची देखील मला आॅफर होती. परंतू तो चित्रपट मी नाही करू शकलो. अमिताभ बच्चन यांनी खरोखरच त्या चित्रपटांमध्ये धमाकेदार कामगिरी नक्कीच केली आहे. मी अजूनपर्यंत हे चित्रपट बघितले देखील नाहीत. कारण मला अजूनही माझ्या त्या निर्णयाची पश्चाताप होतो.

मला अजूनही वाटते की, मी त्या चित्रपटांमध्ये काम करायच हवे होते. मात्र, मी नाही करू शकलो. पुढे शत्रुघ्न सिन्हा हे म्हणाले की, मनोज कुमार मला शोर चित्रपटांमध्ये घेऊ इच्छित होते. ते वारंवार माझ्या घरी येत होते. त्यांना चार महिन्यात हा चित्रपट करायचा होता. मात्र, त्यासाठी देखील मी वेळ देऊ शकलो नाही. मी अजूनही शोर हा चित्रपट बघितला नसल्याचे त्यांनी म्हटले.