मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : सध्या सर्वत्र प्रत्येक जण रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या थाटात आणि आनंदाने साजरा करत आहेत. भाऊ – बहिणीच्या नात्याला आधिक घट्ट करणारा हा सण सेलिब्रिटी देखील मोठ्या थाटात साजरा करतात. पण बॉलिवूडमधील काही अभिनेते असे देखील आहेत, ज्यांच्या बहिणी झगमगत्या विश्वापासून दूर आहेत. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि सनी देओल, बॉबी देओल यांच्या बहिणी बॉलिवूडपासून दूर आहेत. आता जाणून घेवू बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या बहिणींबद्दल….
शाह रुख खान (Shah Rukh Khan) | शाह रुख खान बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. एवढंच नाही तर, अभिनेता एक ‘फॅमिली मॅन’ आहे. शाहरुख खान याच्या बहिणीचं नाव शहनाज लाला रुख खान आहे. पण शहनाज लाला रुख खान बॉलिवूडपासून कायम दूर राहते. पण शहनाज लाला रुख खान हिला अनेकदा किंग खान याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे.
अभिनेता सलमान खान (Salman Khan) | भाईजानच्या कुटुंबाबद्दल त्याच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. अभिनेत्याची छोटी बहीण अर्पिता कायम लाईमलाईटमध्ये असते. पण सलमान खान याची बहीण अल्विरा मात्र फार कमी समो येते. अल्विरा खान अग्निहोत्री हिची मुलगी मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा रंगत आहे.
आमिर खान (Aamir Khan) | आमिर याला तीन भावंड आहेत. अभिनेत्याला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. निखत खान, फरहत खान दत्ता अशी अभिनेत्याच्या बहिणींची नावे आहेत. त्याच्या भावाचं नाव फैजल खान असं आहे. भाऊ बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असला तरी, निखत खान, फरहत खान दत्ता बॉलिवूडपासून दूर असतात.
सनी देओल (Sunny Deol) | धर्मेंद्र यांना चार मुली आणि दोन मुलं आहेत. सनी देओल यांच्या सावत्र बहिणी ईशा देओल आणि अहाना देओल यांच्या दोन सख्या बहिणी देखील आहेत. त्याचं नाव अजीता देओल, विजेता देओल आहे. दोघी बॉलिवूडपासून दूर असतात.
अजय देवगन (Ajay Devgn) | अजयच्या खऱ्या आयुष्यातील बहिणीचे नाव नीलम देवगन आहे. पण नीलम देवगन झगमगत्या विश्वापासून फार दूर आहे. पण नीलम हिचा मुलगा अमन देवगण लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.