डिम्पल कपाडिया ही सनी देओल यांच्या प्रेमात बुडून गेली होती, डिम्पलचं लग्न झालं होतं, तरी देखील ती या तयारीत होती…

| Updated on: Jul 29, 2023 | 9:00 PM

डिम्पल कपाडिया हिचं लग्न झालं होतं, तरी सनी देओल यांच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की, ती आणखी एक पुढचं पाऊल उचलणार होती...

डिम्पल कपाडिया ही सनी देओल यांच्या प्रेमात बुडून गेली होती, डिम्पलचं लग्न झालं होतं, तरी देखील ती या तयारीत होती...
Follow us on

मुंबई | 29 जुलै 2023 : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सनी देओल सध्या ‘गरद २’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. पण एका काळ असा होता, जेव्हा सनी देओल त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, अभिनेत्री डिम्पल कपाडिया हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे तुफान चर्चेत आले होते. दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा देखील सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. फार कमी लोकांना माहिती आहे की, पूजा हिच्यासोबत लग्न झालेलं असताना देखील सनी आणि डिंपल सिक्रिट रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या नात्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.

सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. दोघांच्या ऑनस्क्रिन जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘मंजील-मंजील’, ‘आग का गोला’, ‘गुनाह’, ‘नरसिन्हा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सनी – डिम्पल यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये प्रेम बहरलं होतं.

सनी आणि डिम्पल यांच्या नात्याची चर्चा रंगत होती, तेव्हा सनी देओल यांचं पूजा यांच्यासोबत लग्न झालं होतं. तर दुसरीकडे डिम्पल कपाडिया यांचं लग्न प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत झालं होतं. विवाहित असताना देखील रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे सनी – डिम्पल यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली.

दरम्यान, १९९० साली सनी – डिम्पल यांचे काही फोटो देखील सर्वत्र व्हायरल झाले होते. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. फोटोमध्ये दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिम्पल हिच्या दोन्ही मुली ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सनी यांना छोटे बाबा म्हणून हाक मारायच्या.

अनेक मीडिया रिपोर्टनुसार, सनी – डिम्पल यांनी लग्न देखील केलं होतं. पण सनी यांची पत्नी पूजा यांनी पतीला धमकी दिली.. डिम्पल हिच्यासोबत असलेलं नातं संपवलं नाही तर घटस्फोट घेत मुलांना घेवून निघून जाईल… अशी परिस्थिती ओढावल्यानंतर सनी यांनी देखील प्रेमाचा त्याग करत कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं.

सनी – डिम्पल यांच्यात अनेक वाद झाल्यानंतर अभिनेत्रीने देखील वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे सनी – डिम्पल यांची प्रेमकथा पूर्ण होवू शकली नाही. पण दोघे आजही चांगले मित्र आहेत.. असं सांगितलं जातं. पण सनी देओल यांचा मुलगा करण देओल यांच्या लग्नात डिम्पल आल्या नसल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या.