Sunny Deol | ‘कोणी कोणाचा तिरस्कार करत नाही, कारण…’, पाकिस्तानी चाहत्यांबद्दल सनी देओल यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 16, 2023 | 8:14 AM

Sunny Deol | पाकिस्तानी चाहत्यांबद्दल असं काय म्हणले अभिनेते सनी देओल, सर्वत्र चर्चांना उधाण.. 'गदर २' सिनेमाला फक्त भारतातून नाही तर, पाकिस्तानातून देखील मिळतय प्रेम... पाकिस्तानी चाहत्यांबद्दल सनी देओल यांचं मोठं वक्तव्य

Sunny Deol | कोणी कोणाचा तिरस्कार करत नाही, कारण..., पाकिस्तानी चाहत्यांबद्दल सनी देओल यांचं मोठं वक्तव्य
Follow us on

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘गदर २’ सिनेमाची चर्चा रंगताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. सलग पाच दिवस सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजक करण्यात यशस्वी ठरत आहे. सिनेमा २०० कोटी रुपयांचा गल्ला पार करेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. शिवाय येत्या शनिवारी आणि रविवारी सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाला फक्त भारतातून नाही तर, पाकिस्तानातून देखील प्रचंड प्रेम मिळत आहे. पाकिस्तानातून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल खुद्द अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अनेक लोक सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी करत आहेत. दरम्यान, सोमवारी, अभिनेत्याने स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना आपल्या सिनेमाचं प्रमोशन केलं. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या लोकांना एकाच मातीचं असल्याचं देखील सांगितलं.

जेवढ प्रेम सनी देओल यांच्या ‘गदर: एक प्रेम कथा’ सिनेमाला मिळालं होतं, तेवढंच प्रेम ‘गदर २’ सिनेमाला देखील मिळत आहे. भारतात या सिनेमाला भरभरून प्रेम मिळत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातूनही या सिनेमालाला प्रेम दिलं जात आहे.

‘गदर-2’ सिनेमाला सीमेपलीकडून मिळत असलेल्या प्रेमावर सनी देओल यांची प्रतिक्रिया सध्या तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्कानातून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल अभिनेते म्हणाला, ‘प्रेम सर्वत्र आहे आणि कोणीही कोणाचा तिरस्कार करत नाही. कारण, आम्ही कलाकार आहोत… आम्ही सर्वांचे आहोत.. कोणा एकाचे नाही..’ सध्या सर्वत्र सनी देओल याच्या प्रतिक्रियेची चर्चा रंगत आहे.

‘गदर: एक प्रेम कथा’ प्रमाणेच या सिनेमाच्या सीक्वलनेही चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सिनेमाला मिळत असलेलं यश पाहता ‘गदर ३’ सिनेमाच्या चर्चांनी जोर धरला आहे. यंदाच्या वर्षातील यशस्वी सिनेमांच्या यादीत आता ‘गदर २’ सिनेमाचा देखील समावेश झाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘गदर २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

१५ ऑगस्ट पूर्वी सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिनेमा यशस्वी ठरला. दिवसागणिक सिनेमाच्या कमाईच्या आकडा वाढताना दिसत आहे. सनी देओल यांचा ‘गदर २’ सिनेमा कमाईच्या बाबतीत अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ला टक्कर देणार असल्याच्या देखील चर्चा रंगत आहे. आतापर्यंत ‘गदर २’ सिनेमाने जवळपास कोटी रुपयांची कमाई केली आहे.