Video | ऋतिक रोशन याची नक्कल करणे टायगर श्रॉफ याला पडले अत्यंत महागात, तूफान ट्रोल

| Updated on: Oct 22, 2023 | 4:47 PM

टायगर श्रॉफ हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. टायगर श्रॉफ याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. टायगर श्रॉफ आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.

Video | ऋतिक रोशन याची नक्कल करणे टायगर श्रॉफ याला पडले अत्यंत महागात, तूफान ट्रोल
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा त्याच्या गणपत या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. गणपत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी टायगर श्रॉफ हा बिग बाॅस 17 मध्ये पोहचला. यावेळी टायगर श्रॉफ याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) ही देखील उपस्थित दिसली. टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांनी बिग बाॅसच्या घरातील सदस्यांना एक खास टास्क दिला. ज्यानंतर बिग बाॅस 17 (Bigg Boss 17) च्या घरात हंगाना होताना देखील दिसला.

टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन हे त्यांच्या गणपत या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांची जोडी प्रेक्षकांना आवडलीये. गणपत चित्रपटात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. गणपत या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

टायगर श्रॉफ हा नुकताच मुंबई मेट्रोने प्रवास करताना दिसला. टायगर श्रॉफ याचा मुंबई मेट्रोतील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. मात्र, टायगर श्रॉफ याचा हा व्हिडीओ लोकांना फार जास्त आवडला नसल्याचे दिसतंय. बाॅलिवूड स्टार यांना खडेबोल सुनावताना अनेकजण दिसले आहेत.

एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन देखील अशाचप्रकारे प्रवास करताना दिसला. दुसऱ्याने लिहिले की, चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी यांना हिच एक जागा मिळत आहे. तिसऱ्याने लिहिले की, बाॅलिवूड कलाकारांनी फालतूगिरी लावलीये. अक्षय कुमार देखील काही दिवसांपूर्वीच सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन अशाप्रकारे करताना दिसला.

टायगर श्रॉफ हा कायमच त्याच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो. टायगर श्रॉफ याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले जात होते. मात्र, आता यांच्या ब्रेकअपची थेट चर्चा रंगताना दिसली. ज्यानंतर यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्काच बसला. टायगर श्रॉफ आणि दिशाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.