बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. वरुण धवन याची पत्नी नताशा दलाल हिने 3 जून 2024 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. वरुण धवन आणि नताशा यांनी अजून मुलीच्या नावाची घोषणा केली नाहीये. हेच नाही तर मुलीचा एकही फोटो अजून शेअर करण्यात नाही आला. चाहते हे मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन आणि नताशा यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन याने सोशल मीडियावर एक अत्यंत खास अशी पोस्ट देखील शेअर केली. जी पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसली.
वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. वरुण धवन, नताशा आणि त्यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या फोटोमध्ये वरुण धवन हा आपल्या लेकीला रूग्णालयातून घरी घेऊन जाताना दिसला. मात्र, यावेळी मुलीचा चेहरा दिसू दिला नाही.
आता लेकीच्या जन्मानंतर वरुण धवन हा नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगितले जातंय. सध्या वरुण धवन आणि नताशा हे जुहू येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. जी वरुण धवन याने 2017 मध्ये विकत घेतली होते. आताच आलेल्या रिपोर्टनुसार वरुण धवन हा भाड्याच्या घरात शिफ्ट होणार आहे. अत्यंत आलिशान घरात राहण्यास वरुण धवन जातोय.
वरुण धवन हा हृतिक रोशनचा भाडेकरी होणार आहे. होय तुम्ही खरे ऐकले. वरुण धवन हा हृतिक रोशनच्या मुंबई येथील जुहू येथील सी फेसिंगअपार्टमेंटमध्ये शिफ्ट होत आहे. वरुण धवन याने हे घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळतंय. हे एक अत्यंत आलिशान असे घर असल्याचे देखील सांगितले जात आहे. अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला यांचा शेजारी वरुण धवन होणार आहे.
मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन हा चांगलाच आनंदात असल्याचे बघायला मिळतंय. वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे लग्न अत्यंत आलिशान पद्धतीने आलिबाग येथे झाले. या लग्नासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पोहचले होते. काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत वरुण धवन याने स्पष्ट केले होते की, आपल्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे.