विकी भैया, कतरिना भाभी मारती नहीं हैं क्या?; ‘तो’ फोटो व्हायरल झाल्याने विकी कौशल ट्रोल

| Updated on: Jul 08, 2024 | 5:08 PM

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे विकी कौशल याचे हे चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसत आहेत. सध्या विकी कौशल याचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहतेही हैराण झाले.

विकी भैया, कतरिना भाभी मारती नहीं हैं क्या?; तो फोटो व्हायरल झाल्याने विकी कौशल ट्रोल
Vicky Kaushal and Tripti Dimri
Follow us on

बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल कायमच चर्चेत असतो. सध्या विकी काैशल हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विकी काैशल याचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट 19 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. या चित्रपटातील एक गाणे उद्या रिलीज होणार आहे. विकी काैशल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसतोय. विकी काैशल याचा कोणताही चित्रपट असो पतीच्या सपोर्टसाठी कायमच कतरिना कैफ ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करते. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी राजस्थानमध्ये अत्यंत शाही थाटात लग्न केले.

विकी काैशल आणि बॉलिवूड अभिनेत्री तृप्ति डिमरी यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. पाण्यामधील हा फोटो असून तृप्ति डिमरी आणि विकी काैशल रोमांटिक होताना दिसत आहेत. या फोटोनंतर लोकांना थेट कतरिना कैफ हिची आठवण आलीये. मुळात म्हणजे तृप्ति डिमरी हिनेच या फोटोसोबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

मुळात म्हणजे तृप्ती डिमरी हिने शेअर केलेला हा फोटो चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा आहे. हा फोटो शेअर करत तृप्ती डिमरीने लिहिले की, चित्रपटाचे दुसरे गाणे 9 जुलै रोजी रिलीज होणार आहे. ‘जानम’ असे तिने लिहिले आहे. या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. अनेकांनी विकी काैशल याची फिरकी घेतलीये. 

एकाने या पोस्टवर कमेंट कर म्हटले की, विक्की भैया, कटरीना भाभी मारती नहीं हैं क्या?;. दुसऱ्याने लिहिले की, कतरिना कैफच्या हातामधून विकी काैशल सुटत जात आहे. तिसऱ्याने लिहिले की, आज रात्री नक्कीच विकी काैशलला जेवायला मिळणार नाहीये, कतरिनाचा अजिबातच धाक विकीवर राहिला नाहीये.

अजून एकाने लिहिले की, विकी भैया तुला कतरिनाने खूप जास्त मोकळे सोडले आहे. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. सोशल मीडियावर कतरिना कैफ सक्रिय दिसते. विकी काैशल याच्यासोबतचे खास फोटो शेअर करताना कायमच कतरिना दिसते. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.