बॉलिवूड अभिनेता विकी काैशल हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. काही दिवसांपूर्वी विकी काैशल आणि सारा अली खान यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाने धमाका केला. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी 2021 मध्ये लग्न केले. राजस्थानमध्ये यांचा विवाहसोहळा अत्यंत खास पद्धतीने पार पडला. लग्नानंतर काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. नेहमीच विकी काैशल आणि कतरिना कैफ हे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वीच पती विकी काैशल याच्या चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केले होते.
विकी काैशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. एका मुलाखतीमध्ये विकी काैशल याने कतरिना कैफ हिच्यासोबतच्या वादावर भाष्य केले. या मुलाखतीमध्ये त्याने दोघांमध्ये कोणत्या कारणामुळे कायमच वाद होतात हे सांगितले आहे. विकी काैशल म्हणाला की, एकाच कारणामुळे माझ्यात आणि कतरिनात वाद होतात.
कपाटातील जागेवरून आमच्यात वाद होतात. तिने तिचे साहित्य दीड खोलीमध्ये ठेवले आहे आणि माझ्याकडे एक वॉर्डरोब आहे जो लवकरच ड्रॉवर बनू शकेल. हा खुलासा त्याने करण जोहरच्या शोमध्ये केला. विकी काैशल याचे हे बोलणे ऐकून करण त्याला बिचारा म्हणताना देखील दिसला.
करणने म्हटले की, शेवटी ती एक ‘हिरोईन’ आहे…काही दिवसांपूर्वीच विकी काैशल आणि कतरिना कैफ हे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस विदेशात साजरा करताना दिसले. कतरिना कैफ ही विकी काैशल याच्या अगोदर रणबीर कपूर याला डेट करत होती. हेच नाही तर कतरिना कैफ हिच्यामुळेच दीपिका आणि रणबीरचे नाते तुटल्याचेही सांगितले जाते.
सलमान खान याच्यासोबतही कतरिना कैफ हिचे नाव जोडले गेले होते. दोघे अनेकदा एकसोबत स्पॉट होताना देखील दिसले. विकी काैशल याला अनेक दिवस डेट केल्यानंतर कतरिनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्याच्या अगोदरच कतरिनाने एक मोठी धमकी दिल्याचेही विकी काैशल याने सांगितले होते. लग्नाच्या दोन दिवसांनीच चित्रपटाची शूटिंग करणार असशील तर लग्न नाही करायचे असेच थेट कतरिनाने म्हटले होते.