मुंबई : विकी काैशल हा त्याचा सॅम बहादूर या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विकी काैशल याचा हा चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसतोय. नुकताच आता विकी काैशल याने थेट पत्नी कतरिना कैफ हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. कतरिना कैफ हिचे काही राज उघडे करताना विकी दिलाय. विकी काैशल म्हणाला की, मी काय कपडे घालायचे आणि काय नाही हे सर्वकाही कतरिना कैफ हिच ठरवते. मला अनेकदा कपड्यांमुळे तिचा ओरडा खावा लागलाय. विकी काैशल याने थेट कतरिना कैफ हिच्याबद्दल अजून एक मोठा खुलासा केला.
विकी काैशल म्हणाला की, मी एकदा बाहेर निघालो होतो…मात्र, अचानक कतरिना कैफ हिने माझा हात पकडून मला मागे ओढले. कतरिनाने मला स्पष्ट सांगितले की, मी तुला बाहेर जाऊ देणार नाहीये. मी तिला म्हटले की, यामध्ये काय वाईट आहे, तिने थेट म्हटले सर्वकाही…शेवटी मी तिला ठिक आहे म्हणत कपडे बदलून बाहेर गेलो.
मुळात म्हणजे कतरिना कैफ ही माझ्या तोंडावरच माझ्या कपड्यांना वाईट म्हणते. पुढे विकी म्हणाला, तिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाली की, ती खूप जास्त मेहनत करते. ती नेहमीच डाएटवर लक्ष देते. खरोखरच ती खूप जास्त मेहनत घेते. सर्व गोष्टी तिला तिच्या याच मेहनतीमुळे मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सॅम बहादूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी कतरिना पोहचली.
कतरिना कैफ हिने मोठा खुलासा करत सांगितले होते की, एकाच घरात असूनही माझी आणि विकीची भेट होत नाही. तो त्याच्या चित्रपटात बिझी आहे आणि मी माझ्या चित्रपटात. नशीब की आम्ही दिवाळी एकसोबत साजरी केली. पुढे कतरिना म्हणाली, असे नाही की, आम्ही एकमेकांना मिस करत नाहीत. तो आणि मी एकमेकांना मिस करतो.
विकी काैशल याने कतरिना कैफ हिच्याबद्दल केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. विकी काैशल याच्या सॅम बहादूर या चित्रपटाने मोठा धमाका नक्कीच केलाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विकी काैशल हा दिसला. आता पुढील काही दिवसांमध्ये हा चित्रपट कमाईमध्ये काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.