फक्त नेटकरीच नव्हे तर कलाकारांनीही लावला पूनम पांडेचा क्लास, कोणी म्हटले मुर्खपणा तर कोणी म्हटले प्रसिद्धीसाठी..

| Updated on: Feb 04, 2024 | 6:27 PM

पूनम पांडे हिचे निधन झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. थेट अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल मोठा संभ्रम बघायला मिळाला. यानंतर मोठे खुलासे होताना देखील दिसले.

फक्त नेटकरीच नव्हे तर कलाकारांनीही लावला पूनम पांडेचा क्लास, कोणी म्हटले मुर्खपणा तर कोणी म्हटले प्रसिद्धीसाठी..
Follow us on

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन झाले असल्याची एक पोस्ट तिच्याच सोशल मीडिया अकाऊंटवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. या पोस्टनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर थेट पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचा खुलासा करण्यात आला. यानंतर कंगना राणावत, अनुपम खेर, आलिया भट्ट आणि अनेक मोठ्या कलाकारांनी तिच्या निधनाचे दु: ख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. काही चाहते हे पूनम पांडे हिचे अंत्यदर्शन घेण्यासाठी थेट तिच्या घराकडे पोहचले. सतत पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल खुलासे होताना दिसले.

सुरूवातीपासूनच पूनम पांडे हिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून मोठा संभ्रम हा बघायला मिळाला. त्यानंतर निधनाच्या पोस्टच्या तब्बल 24 तासांनंतर पूनम पांडे हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी जिवंत आहे…या व्हिडीओमध्ये पूनम पांडे ही लोकांची माफी मागताना देखील दिसली.

अनुपम खेर यांनी पूनम पांडे हिच्या निधनाच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. मात्र, पूनम पांडे पूनमने जिवंत असल्याचा व्हिडीओ शेअर करताच अनुपम खेर यांना पोस्ट डिलीट करावी लागली. आता अनेक कलाकारांनी देखील पूनम पांडे हिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली आहे.

तमिल अभिनेत्री कस्तूरी शंकर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिचा चांगलाच क्लास लावल्या बघायला मिळतंय. हेच नाही तर कस्तूरी शंकर हिने म्हटले की, हा फक्त नाटकी प्रकार आहे. पूनमने लोकांचे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी हा स्टंट केला आहे आणि हा सर्व मुर्खपणा आहे.

अभिनेत्री शेफाली हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. शेफाली हिने लिहिले की, मुळात म्हणजे लोक हे प्रसिद्धीसाठी कॅन्सरचा वापर करतात हे खूप जास्त दुःख आहे. अभिनेत्रीने पुढे लिहिले की, मला माहित नाही की पूनम पांडे कोण आहे, परंतू गर्भाशयातील कॅन्सरने निधन झाल्याचे खोटे सांगितले हे खूप जास्त त्रासदायक नक्कीच आहे.