ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे त्यावेळीचे हे सर्वाधिक चर्चेत असणारे एक लग्न होते. गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. काही रिपोर्टमध्ये असाही खुलासा करण्यात आला की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घरही सोडले आहे.
अनंत अंबानी याच्या आर्शिवाद सेरेमनीनंतर ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात पोहोचली. फक्त ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन या विदेशात गेल्याने लोकांना धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन विदेशात जाताना दिसत आहे. अभिषेक बच्चन याच्यासोबत ऐश्वर्या जास्त स्पॉट देखील होत नाही.
सध्या ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो मुंबई एअरपोर्टवरील आहेत. विदेशात सुट्टी घालून ऐश्वर्या आणि आराध्या भारतात परतल्या आहेत. यावेळी दोघीही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसल्या. विशेष म्हणजे यावेळी आराध्याकडे सर्वांच्या नजरा दिसल्या.
या फोटोमध्ये बारा वर्षाच्या आराध्याची उंची ऐश्वर्या राय हिच्या इतकी दिसत आहे. आराध्या आणि ऐश्वर्या राय यांना पाहून लोकांना धक्का बसला. अचानकपणे आराध्या बच्चन हिची उंची इतकी जास्त कशी वाढली असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. आता हेच फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी मायलेकीची सुंदर जोडी देखील म्हटले आहे.
सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. खरोखरच यांचा घटस्फोट होणार का? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. श्वेता बच्चन हिच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचे सांगितले जातंय. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यामध्येच श्वेता बच्चन राहत आहे आणि हेच वादाचे कारण असल्याचे सांगितले जातंय.