ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जात आहे. अनंत अंबानी याच्या लग्नाला देखील ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. दुसरीकडे अख्ये बच्चन कुटुंबिय एकत्र पोहोचले होते. घटस्फोटाच्या चर्चांमध्येच सतत विदेशात जाताना ऐश्वर्या राय ही दिसत आहे. मात्र, त्यावेळी अभिषेक बच्चन ऐश्वर्यासोबत अजिबातच दिसत नाहीये. मुलगी आराध्या हिच्यासोबतच ऐश्वर्या राय ही विदेशात जात आहे.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय ही पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये पोहोचली होती. यावेळी देखील तिच्यासोबत मुलगी आराध्या ही होती. आता नुकताच IIFA अवॉर्ड्स 2024 मधून ऐश्वर्या राय ही भारतात परतलीये. IIFA अवॉर्ड्स 2024 ला देखील अभिषेक बच्चन हा मुलगी आणि पत्नीसोबत पोहोचला नव्हता. IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये ऐश्वर्याला तिच्या अभिनयासाठी पुरस्कार मिळालाय.
सध्या सोशल मीडियावर IIFA अवॉर्ड्स 2022 चा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. त्या व्हिडीओमध्ये स्टेजवरून खाली येत मुलगी आराध्या आणि पत्नी ऐश्वर्या राय यांच्यासमोर धमाकेदार डान्स करताना अभिषेक बच्चन हा दिसतोय. विशेष म्हणजे ऐश्वर्या देखील जागेवर बसूनच अभिषेकसोबत डान्स करताना दिसत आहे.
लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडतोय. मात्र, IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये ऐश्वर्या राय ही मुलीसोबतच पोहोचली. हेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून अजिबातच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे एकत्र येताना दिसत नाहीयेत. सतत घटस्फोटाच्या चर्चा असताना देखील यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच भाष्य करताना दिसत नाहीये.
ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्षा हा बंगला श्वेता बच्चन हिच्या नावावर केल्यानंतरच वादाला तोंड फुटल्याचे सांगितले जातंय. श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यात राहत असल्याचेही ऐश्वर्या पटले नसल्याचे सांगितले जाते.