ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाचे हे आहे मोठे कारण?, ‘हा’ व्यक्ती अभिनेत्रीच्या आयुष्यात…

| Updated on: Aug 11, 2024 | 12:16 PM

Aishwarya Rai and Abhishek Bachchan Divorce : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मात्र, यावर भाष्य करणे ऐश्वर्या राय हिने टाळले आहे. हेच नाही तर सतत ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगितले जाते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाचे हे आहे मोठे कारण?, हा व्यक्ती अभिनेत्रीच्या आयुष्यात...
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, ऐश्वर्या राय ही काही लोकांनाच सोशल मीडियावर फॉलो करते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये मुंबई येथे झाले. विशेष म्हणजे हे लग्न 2007 मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले लग्न आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय विभक्त झाल्याची जोरदार चर्चा आहे.

ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगितले जाते. लवकरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होईल, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, सतत घटस्फोच्या चर्चा सुरू असतानाच ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन किंवा जया बच्चन यांनी काहीच भाष्य केले नाहीये. यामुळेच चाहते हे अधिकच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

मुळात म्हणजे या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होण्यामागे एका डॉक्टरचे नाव पुढे येताना दिसत आहे. जिरक मार्कर असे डॉक्टरचे नाव असून यांची आणि ऐश्वर्या रायची मैत्री खूप जास्त जुनी आहे. जिरक मार्करमुळेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. या दोघांचे नाव जोडले जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात जिरक मार्कर आणि ऐश्वर्या राय हे एकत्र पोहोचले होते. विशेष म्हणजे दोघांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. तेंव्हापासूनच विविध चर्चा या सुरू झाल्या. काही लोकांचे म्हणणे आहे की, ऐश्वर्या राय आणि जिरक मार्कर यांची मैत्रीच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाचे कारण आहे. ही फक्त तशी चर्चा आहे, त्यावर दावा केला जाऊ शकत नाही.

नुकताच भारतीय खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी अभिषेक बच्चन हा पॅरिसला गेल्याचे बघायला मिळाले. अभिषेक बच्चन याने पॅरिसमधून एक खास असा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी त्याने तो फोटो स्टेडियममध्ये काढल्याचे बघायला मिळाले. भारताचा झेंडा देखील अभिषेक बच्चनने हातात घेतला होता. यावेळी अनेकांनी अभिषेक बच्चन याला विचारले की, ऐश्वर्या राय कुठे आहे?.