ऐश्वर्या राय हिच्या लेकीचे ‘ते’ फोटो व्हायरल, आराध्या बच्चनचे फोटो पाहताच चाहते..

| Updated on: May 18, 2024 | 12:46 PM

ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. फक्त ऐश्वर्या राय हिच नाही तर तिची मुलगी आराध्या बच्चन देखील चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. आराध्या बच्चन हिचा नवा लूक लोकांना चांगलाच आवडल्याचे बघायला मिळतंय. आता आराध्याचे काही खास फोटो व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्या राय हिच्या लेकीचे ते फोटो व्हायरल, आराध्या बच्चनचे फोटो पाहताच चाहते..
Aishwarya Rai
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग असून ती कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ऐश्वर्या राय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. ऐश्वर्या रायला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे अत्यंत खास पद्धतीने ऐश्वर्या राय आणि अभिषेकचे लग्न पार पडले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची 12 वर्षांची मुलगा देखील आहे.

ऐश्वर्या राय ही सध्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झालीये. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय ही जबरदस्त लूकमध्ये दिसली. ऐश्वर्या राय हिच्या हाताला मोठी दुखापत झालेली असताना देखील कान्स फिल्म फेस्टिवल दाखल झालीये. यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत आराध्या बच्चन देखील कान्स फिल्म फेस्टिवल गेलीये. ऐश्वर्यासोबतच आराध्याचेही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

ऐश्वर्या रायच्या हाताला प्लॅस्टर झाले असल्याने तिची काळजी घेताना आराध्या बच्चन दिसत आहे. आता नुकताच ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो चाहत्यांसाठी प्रचंड आवडले आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन या बाल्कनीत उभ्या दिसत आहेत.

यावेळी ऐश्वर्या राय हिच्यापेक्षाही लोकांना आराध्या बच्चन हिचा लूक अधिक आवडलाय. लोक आराध्या बच्चन हिचे काैतुक करताना दिसत आहेत. काल व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या राय हिच्या हाताला धरून तिची काळजी घेताना आराध्या बच्चन दिसली होती. त्यामध्येच आता हे अत्यंत खास असे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

ऐश्वर्या राय ही गेल्या अनेक वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होते. विशेष म्हणजे दरवेळी ऐश्वर्या रायच्या लूकची चर्चा देखील रंगताना दिसते. ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सातत्याने सांगितले जातंय. हेच नाही तर अभिषेक बच्चन याच्यासोबत लवकरच ऐश्वर्या राय ही घटस्फोट घेणार असल्याचेही चर्चा आहे. मात्र, यावर अजूनही बच्चन कुटुंबियांपैकी कोणी काही भाष्य केले नाहीये.