Aaradhya Bachchan | ‘या’ प्रसिद्ध शाळेत शिकते आराध्या बच्चन; किती फी भरते ऐश्वर्या राय?

| Updated on: Aug 04, 2023 | 3:00 PM

मुलीच्या शिक्षणासाठी ऐश्वर्या राय भरते इतकी फी; जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र आराध्या बच्चन हिची शाळा आणि शिक्षणाची चर्चा...

Aaradhya Bachchan | या प्रसिद्ध शाळेत शिकते आराध्या बच्चन; किती फी भरते ऐश्वर्या राय?
Follow us on

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील एका खास कारणामुळे ऐश्वर्या चर्चेत आली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी २००८ मध्ये लग्न केलं. दोघांना एक मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या ११ वर्षीय मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे. आराध्या सध्या तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेत बच्चन कुटुंबाची लेक शिक्षण घेत आहे. मुलीच्या शिक्षणासाठी ऐश्वर्या किती फी भरते असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या बच्चन यांची चर्चा सुरु आहे.

ऐश्वार्या कायम तिच्या लेकीसोबत दिसते. कायम मुलीची काळजी घेताना अभिषेक आणि ऐश्वर्या दिसते. म्हणूनच लेकीच्या शिक्षणाचा विचार करत ऐश्वर्या हिने मुंबईच्या प्रसिद्ध शाळेत लेकीला शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

लेक आराध्याच्या शिक्षणासाठी ऐश्वर्याने धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची निवड केली आहे. अंबानी स्कूलमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं शिक्षण घेतात. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर यांनी देखील अंबानी स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे.

हे सुद्धा वाचा

मीडिया रिपोर्टनुसार, धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल देशातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे. एवढंच नाही तर, मिळालेल्या माहितीनुसार, धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीपर्यंत फी १ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.

धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ११ वी आणि १२ वी इयत्तेची फी ९.६५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. ८ वी ते १० वी इयत्तेची फी १ लाख ८५ हजार रुपये आहे. तर ८ वी ते १० वी इयत्तेची फी ४ लाख ५८ हजार रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्टारकिड्सची चर्चा तुफान रंगलेली असते. अनेक ठिकाणी सेलिब्रिटींना त्यांच्या मुलांसोबत स्पॉट केलं जातं. शिवाय सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची मुलगी आराध्या बच्चन देखील लोकप्रिय सेलिब्रिटी किड आहे.