ऐश्वर्या राय हिने मान्य केली ‘ती’ गोष्ट, म्हणाली, अभिषेक बच्चन व माझ्यात मतभेद आणि वाद…

| Updated on: Jul 25, 2024 | 10:44 AM

ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या राय ही काही दिवसांपूर्वीच आपल्या लेकीसोबत विदेशात जाताना दिसली. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जाते.

ऐश्वर्या राय हिने मान्य केली ती गोष्ट, म्हणाली, अभिषेक बच्चन व माझ्यात मतभेद आणि वाद...
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
Follow us on

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी बॉलिवूडच्या टॉप जोडीपैंकी आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न केले. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी देखील आहे. लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. हेच नाहीतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला गेल्याचेही सांगितले जातंय.

कोणताही पुरस्कार सोहळा असू किंवा मुलगी आराध्या हिच्या शाळेतील फंक्शन याला ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कधीच एकत्र पोहोचताना दिसत नाहीयेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यातही बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्या राय ही पोहोचली नाही. यामुळेच घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच उधाण आल्याचे बघायला मिळाले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता ऐश्वर्या राय हिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही अत्यंत मोठे खुलासे आपल्या आणि अभिषेक बच्चनबद्दल करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही तिच्यामधील आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मतभेदावर स्पष्ट बोलताना दिसत आहे.

ऐश्वर्या राय म्हणाली की, माझ्याlतील आणि अभिषेकमधील मतभेद तशी आमची वैयक्तिक बाब आहे. आम्ही दोघे खूप मजबूत विचारशील व्यक्तिमत्त्व आहोत आणि आम्ही अजूनही वाद घालणे आणि चर्चा करणे यातील फरक शिकत आहोत. आमच्यात खूप मजबूत जीन्स आहेत. त्यामुळे आम्ही नैसर्गिकरित्या मजबूत व्यक्तिमत्त्व आहोत. वादविवाद आणि चर्चा यात एक अतिशय बारीक रेषा आहे आणि ती नेमकी काय आहे हे अजूनही शोधत आहोत.

आम्ही खूप चर्चा करतो. कधी नम्रपणे तर कधी वाद घालून  पण…आता ऐश्वर्या राय हिची हीच मुलाखत चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, काही विषयावरून तिच्यामध्ये आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद देखील होतात. ऐश्वर्या राय हिने बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे.