ऐश्वर्या राय ‘या’ दोन गोष्टी केल्याशिवाय अजिबात पडत नाही घराच्याबाहेर, अभिनेत्रीने खुलासा करत..

| Updated on: May 08, 2024 | 11:50 AM

Aishwarya Rai : बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिच्या पर्सनल लाईफबद्दल विविध चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहेत. मात्र, त्यावर ऐश्वर्या रायने बोलणे टाळले.

ऐश्वर्या राय या दोन गोष्टी केल्याशिवाय अजिबात पडत नाही घराच्याबाहेर, अभिनेत्रीने खुलासा करत..
Aishwarya Rai
Follow us on

बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत आहे की, ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन यांच्यासोबत घटस्फोट घेणार आहे, हेच नाही तर त्यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अजूनही बच्चन कुटुंबियापैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावर फार जास्त सक्रिय दिसत नाही. हेच नाही तर फार कमी लोकांना ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावर फाॅलो करताना दिसते. ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय.

मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय हिला विचारण्यात आले की, घराच्या बाहेर पडताना कोणते काम न विसरता करते? यावर ऐश्वर्या राय म्हणाली की, मी घराच्या बाहेर निघताना न विसरता मस्कारा आणि आयलाईनर डोळ्यांना लावते. मी कधीच मस्कारा आणि आयलाईनर लावल्याशिवाय घराच्याबाहेर पडत नसल्याचे सांगताना ऐश्वर्या राय दिसतंय.

हेच नाही तर डोळ्यांची आणि चेहऱ्याची काळजी घेते हे देखील ऐश्वर्या राय सांगते. ऐश्वर्या राय हिच्या डोळ्यांचे अनेकजण चाहते आहेत. ऐश्वर्या राय हिने मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितले की, ती तिच्या डोळ्यांची अधिक काळजी घेते. ऐश्वर्या राय ही काही दिवसांपूर्वीच मुलगी आराध्या आणि पती अभिषेक बच्चन यांच्यासोबत विदेशात जाताना दिसली.

ऐश्वर्या राय हिच्याकडे अभिषेक बच्चन याच्यापेक्षाही अधिक संपत्ती आहे. ऐश्वर्या राय हिने काही वर्षे सलमान खान याला डेट केले. त्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले. या लग्नाची त्यावेळी जोरदार चर्चा देखील होती. अभिषेक आणि ऐश्वर्याची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे.