सातत्याने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चास सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबासोबत नाहीतर मुलगी आराध्या हिच्यासोबत पोहोचली होती. अनंतच्या लग्नानंतर मुलीसोबतच ऐश्वर्या राय ही विदेशात गेली. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर अजूनही ऐश्वर्या राय, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय हिने अभिषेकचे घर सोडल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. त्यामध्येच आता घटस्फोटाची एक पोस्ट अभिषेक बच्चन याने लाईक केल्यामुळे मोठा हंगामा बघायला मिळतोय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. काही वर्षे डेट केल्यानंतर हे लग्न केले होते. सध्या सोशल मीडियावर अभिषेक बच्चन याचा एक जुना व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.
करण जोहर याच्या शोमधील हा व्हिडीओ असून करण जोहर हा अभिषेक बच्चन याला विचारतो की, ऐश्वर्या राय हिच्यासोबत वेळ घालवताना कुटुंबात फसलेला माणूस असल्यासारखे तुला कधी वाटले का? कारण जया बच्चन यांचा तारा, बहीण श्वेता बच्चन हिचे आयुष्य तू आहेस. तुझ्या आयुष्यात अजून एक महिला आहे पत्नी ऐश्वर्या. तुला कधी वाटले का या महिलांमध्ये तुला अभिनय करण्याची गरज आहे.
यावर ऐश्वर्या राय हिने मजा घेत म्हटले की, त्यावेळी पत्नीलाच दुसरी महिला म्हटले जाते..यावर अभिषेक बच्चन म्हणाला की, या गोष्टीचे श्रेय हे याच महिलांना दिले पाहिजे. या गोष्टींबद्दल माझा संबंध फार कमी येतो. जी गोष्टी सर्वात महत्वाची आहे जी म्हणजे आई आणि ऐश्वर्याचे खूप चांगले नाते आहे. त्या दोघी प्रत्येक गोष्टीवर भाष्य करतात.
जेंव्हा कोणतीही महिला ही आपल्या पतीच्या घरी येते, त्यावेळी तिच्यासाठी सर्व गोष्टी वेगळ्या असतात. मला वाटते की, अशावेळी एकच व्यक्ती असते जी तिची मदत करू शकते ती म्हणजे तिची सासू. यावेळी अभिषेक बच्चन याचे हे बोलणे ऐकून ऐश्वर्या राय ही हसताना देखील दिसत आहे. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या गेल्या आहेत.