बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या अगोदर दोघे एकमेकांना डेट करत होते. शेवटी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याचे खासगी आयुष्यात चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोट घेत असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर कोणीही भाष्य केले नाहीये. घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या राय ही विदेशात जाताना दिसली. यावेळीचे तिचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले.
ऐश्वर्या राय हिचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. ऐश्वर्या राय हिच्यामुळे विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात जोरदार वाद बघायला मिळाले. नुसता वादच नाही तर दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. सार्वजनिकपणे दोघे आरोप करत होते. हे दोघेही गंभीर आरोप करत होते.
ज्यावेळी सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यात वाद सुरू होता, त्यावेळीच ऐश्वर्या राय ही चित्रपटाचे शूटिंग करत होती. दोघांमधील वादाचा परिणाम ऐश्वर्या राय हिच्यावर असा झाला की, ती थेट चित्रपटाच्या सेटवरच सर्वांसमोर रडत होती. गुजारिश चित्रपटाचे शूटिंग त्यावेळी ऐश्वर्या राय ही करत होती.
ऐश्वर्या राय हिने त्यावेळी म्हटले होते की, मला पाहिजे तसे मी माझे आयुष्य जगत आहे. मी प्रार्थना करते की, बाकी लोकांनीही तसेच करावे. मला खरोखरच माझ्या परिस्थितीवर सोडून द्यावे. यासोबतच ऐश्वर्या राय हिने म्हटले होते की, सलमान आणि विवेक दोघेही जे काही करत आहेत, ते चांगले नाहीये.
सलमान खान याच्यावर आरोप होता की, त्याने ऐश्वर्याला मारहाण केली होती. यावर अभिनेत्याने थेट म्हटले होते की, मी जर तिला मारले असते तर ती आज जिवंत राहिली नसती. विवेक यानेही आरोप केला होती की, त्याने अभिनेत्रीची पूर्णपणे साथ दिली. मात्र, तिने त्याला मध्येच सोडून गेली. हेच नाही तर सलमान खान विवेकच्या घरी त्याला मारण्यासाठी गेल्याचे देखील सांगितले जाते.