नवीन घराची पाहणी करण्यासाठी आई वडिलांसोबत पोहचली राहा, ‘तो’ खास व्हिडीओ व्हायरल..

| Updated on: Jun 25, 2024 | 3:09 PM

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लेक राहा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता नुकताच राहा हिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय. यावेळी नीतू कपूर या देखील दिसत आहेत.

नवीन घराची पाहणी करण्यासाठी आई वडिलांसोबत पोहचली राहा, तो खास व्हिडीओ व्हायरल..
Alia Bhatt
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आलिया भट्ट हिचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आलिया भट्ट सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही आलिया भट्ट कायमच दिसते. आलिया भट्ट ही मुलगी राहा हिला चित्रपटाच्या शूटिंगला घेऊन जाते, असा खुलासा काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूर याने केला. राहा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आलिया भट्ट आणि राहा दिसत आहेत. विशेष म्हणजे आलिया भट्ट हिने राहा हिला घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. राहा हिचा हा व्हिडीओ सर्वांना प्रचंड आवडताना दिसत आहे. सुरूवातीला गाडीमधून रणबीर कपूर उतरला आणि त्यानंतर आलिया भट्ट ही राहा हिला घेऊन निघाली.

शेवटी नीतू कपूर या गाडीमधून उतरल्या. नवीन घराची पाहणी करण्यासाठी राहा आई वडिलांसोबत पोहचली आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. यापूर्वीच राहा हिचा होळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. राहा अत्यंत क्यूट दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक अत्यंत खास असा फोटो शेअर केला होता. आलिया भट्ट हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये रणबीर कपूर आणि राहा दिसत होते. विशेष म्हणजे हा फोटो विदेशातील आहे. या फोटोमध्ये रस्त्यांनी वडिलांच्या हाताला पकडून राहा चालताना दिसत आहे. हा फोटो मागच्या बाजूने घेण्यात आला.

रणबीर आणि आलिया यांच्या फोटोसोबतच अजून एक फोटो आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये रणबीर कपूर आणि ऋषी कपूर हे रस्त्यांनी चालताना दिसत आहेत. त्या फोटोमध्ये ऋषी कपूर यांनी रणबीर कपूरच्या खांद्यावर हात टाकल्याचे दिसतंय. आलिया भट्ट हिने शेअर केलेले हे दोन्ही फोटो चाहत्यांना प्रचंड आवडली होती.