मुंबई : आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट (Movie) रिलीज होत आहेत. विशेष म्हणजे आलिया भट्ट हिचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलइंग असून आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असते. आलिया भट्ट (Alia Bhatt) आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. आलिया भट्ट आणि राहा यांचा काही दिवसांपूर्वीच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी आलिया जवळ राहा दिसली.
आलिया भट्ट ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याचा वाढदिवस झाला. रणबीरच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास पोस्ट ही आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर शेअर केली. यावेळी आलिया भट्ट हिने काही खास फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले. आलिया भट्ट हिचा काही दिवसांपूर्वीच राॅकी आैर रानी की प्रेम कहानी चित्रपट रिलीज झाला.
विशेष म्हणजे राॅकी आैर रानी की प्रेम कहानी चित्रपटात आलिया भट्ट हिच्यासोबत रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसला. आलिया आणि रणवीरच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. राहा हिच्या जन्मानंतर आलिया भट्ट हिने राॅकी आैर रानी की प्रेम कहानी चित्रपटातील गाण्याचे शूटिंग काश्मीर येथे केले.
नुकताच आता आलिया भट्ट हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय. जयदीप अहलावत यांनी आलियाबद्दल मोठे भाष्य केले. जयदीप अहलावत यांनी सांगितले की, मला आलिया भट्ट आणि मेघना गुलजार यांनी मोठी धमकी दिली होती. या दोघांनीही माझा नंबर ब्लाॅकमध्ये टाकण्याची मला धमकी दिली. हा किस्सा राजी चित्रपटाच्या शूटिंगवेळीचा आहे.
जयदीप अहलावत म्हणाले की, राजी चित्रपटाचे शूटिंग हे पटियालामध्ये सुरू होते. त्याच्याकडे खूप कमी वेळ होता आणि त्याला क्लोज अप सीनही करायचा होता. जयदीपने सांगितले मॉनिटरमध्ये मेघना हिला दिसत नव्हते. त्यामुळे मला सांगण्यात आले की, तो सीन तीन टेकमध्ये करू. राजी चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. या चित्रपटासाठी आलिया भट्टचे काैतुकही करण्यात आले.