आलिया भट्ट हिने केला सासू नीतू कपूर यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, ‘त्या’ कायमच…

| Updated on: Oct 13, 2024 | 2:54 PM

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्टची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना आलिया कायमच दिसते.

आलिया भट्ट हिने केला सासू नीतू कपूर यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, त्या कायमच...
Alia Bhatt
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आलिया भट्ट जिगरा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. विशेष म्हणजे राहा हिच्या जन्मानंतरही आलिया चित्रपटांमध्ये धमाल करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया, राहा आणि रणबीर कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. आलिया सध्या जिगरा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतंय. नुकताच आलियाने मोठा खुलासा केलाय.

आलिया भट्ट ही करीना कपूर हिच्या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी करीनाने तिला विचारले की, कपूर कुटुंबामध्ये ती कोणाला आदर्श मानते? यावर आलियाने पटकन सासूबाई नीतू कपूर यांचे नाव घेतले. आलिया म्हणाली की, गेल्या काही वर्षांत आमची खूप चांगली आणि नॅचुरल मैत्री झाली आहे. त्या आमच्यासोबत काही दिवसांपूर्वीच पॅरिसला देखील आल्या होत्या. 

पॅरिसमध्ये माझा एक शो होता. त्यांनी मला म्हटले की, मला तुझ्या शोला यायचे आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून मला खरोखरच खूप जास्त अभिमान वाटला. मी रॅम्पवर चालत असताना त्यांनी मला चियर केले. त्यावेळी मला असे वाटत होते की, मी शाळेत असून माझी आई मला एखाद्या शोमध्ये सपोर्ट करण्यासाठी आलीये.

लग्नाच्या अगोदरही माझे आणि त्यांचे बऱ्याचदा बोलणे झाले. पहिल्यांदाच आलिया भट्ट ही नीतू कपूर यांच्यासोबत असलेल्या नात्यावर बोलताना दिसली. नेहमीच नीतू कपूर या आपल्याला सपोर्ट करत असल्याचेही सांगताना आलिया भट्ट ही दिसली. कपूर कुटुंबियांबद्दल मोठे खुलासे करताना आलिया भट्ट ही दिसली.