Alia Bhatt | सुट्टीच्या दिवशी आलिया भट्ट करते ‘हे’ काम, रणबीर कपूर आणि राहा यांच्यासोबत नाही तर, चक्क

| Updated on: Sep 14, 2023 | 4:57 PM

आलिया भट्ट हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही बाॅलिवूडमध्ये मिळवली आहे. आलिया भट्ट हिला बाॅलिवूडमध्ये करण जोहर याने लाॅन्च केले. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Alia Bhatt | सुट्टीच्या दिवशी आलिया भट्ट करते हे काम, रणबीर कपूर आणि राहा यांच्यासोबत नाही तर, चक्क
आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून मोठा धमाका करताना दिसत आहे. आलिया भट्ट एखाद्या जाहिरातीचा व्हिडीओ किंवा फोटो शेअर करण्यासाठी 1 कोटी रूपये फिस घेते.
Follow us on

मुंबई : आलिया भट्ट हिचा काही दिवसांपूर्वीच रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाने धमाका केला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही आलिया भट्ट (Alia Bhatt) दिसली. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात आलिया भट्ट हिच्यासोबत रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत दिसला. रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाने नक्कीच धमाल केली. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग आलिया भट्ट हिने राहा हिच्या जन्मानंतर केले.

विशेष म्हणजे कश्मीर येथे शूटिंगसाठी राहा हिला देखील आलिया घेऊन गेली. रॉकी और रानी की प्रेम या चित्रपटाने नक्कीच जबरदस्त अशी कमाई केली. करण जोहर या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. रॉकी और रानी की प्रेम चित्रपटाची अत्यंत मोठी स्टार कास्ट बघायला मिळाली. जया बच्चन देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसल्या.

आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.विशेष बाब म्हणजे आलिया भट्ट ही कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आलिया भट्ट ही सध्या तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. आलिया भट्ट या व्हिडीओमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसतंय. या व्हिडीओची विशेष बाब म्हणजे आलिया भट्ट ही आपली सुट्टी रणबीर कपूर किंवा राहा यांच्यासोबत घालवत नाही.

बरेच लोक सुट्टी म्हटले की, आपल्या कुटुंबियांना अधिक वेळ देतात. मात्र, याला आलिया भट्ट ही अपवाद ठरलीये. आलिया भट्ट ही रणबीर कपूर आणि राहा यांना सोडून चक्क आपला सुट्टीचा दिवस स्विमिंग पूलमध्ये घालवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट ही स्विमिंग करताना दिसत आहे. मस्त शांतपणे एकटी आलिया भट्ट ही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना आलिया भट्ट हिने लिहिले की, माझ्या सुट्टीचे शेड्युल…आता आलिया भट्ट हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, काश माझाही सुट्टीचा असा दिवस असावा. दुसऱ्याने लिहिले की, खरोखरच प्रत्येकाने सुट्टीचा दिवस अशाप्रकारे घालायला हवा. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाने 300 कोटींचे कलेक्शन केले आहे.

आलिया भट्ट ही काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खान हिच्या घरी पोहचली. विशेष म्हणजे यावेळी आलिया भट्ट हिच्यासोबत राहा देखील होती. यावेळी आपल्या मुलीचा चेहरा लपवताना आलिया भट्ट ही दिसली. आलिया भट्ट हिने तिच्या मुलीची एकही झलक आपल्या चाहत्यांना अजून दाखवली नाहीये. मात्र, मुलीच्या नावाच अर्थ सांगणारी तिने एक पोस्ट शेअर केली.