मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : मंगळवारी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भवन, दिल्ली येथे करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना पुरस्कार देवून सन्मानित केलं. अभिनेता अल्लू अर्जुन, अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेत्री क्रिती सनॉन, अभिनेते पंकज त्रिपाठी, वहीदा रहमान यांसारख्या अभिनेत्यांसह अनेक दिग्दर्शकांना देखील पुरस्कार देत सन्मानित करण्यात आलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची चर्चा रंगली आहे. चाहते देखील सेलिब्रिटींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. २०२१ मध्ये सिनेविश्वात महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल कलाकारांना गौरविण्यात आलं आहे.
पुरस्कार सोहळ्यात कलाकारांची मंदीयाळी पाहायला मिळाली. पण सर्वांचं लक्ष आलिया भट्ट हिच्यावर येवून थांबलं. त्यामागे देखील मोठं कारण आहे. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आलिया भट्ट हिने लग्नाची साडी नेसली होती. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आलिया भट्ट हिने लग्नाच्या सडीची का निवड केली? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला.
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी लग्नाची साडी का नेसली? याचं कारण खुद्द आलिया भट्ट हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कारण सांगितलं आहे. आलिया म्हणाली, ‘एका खास दिवसासाठी खास कपड्यांची गरज असते आणि अनेकदा ते खास कपडे तुमच्याकडे असतात. जे एका दिवसासाठी खास असू शकतात ते अनेकदा देखील खास ठरु शकतात..’ सध्या सर्वत्र आलिया हिच्या पोस्टची चर्चा आहे.
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आलिया भट्ट हिच्या पती रणबीर कपूर देखील उपस्थित होता. सोशल मीडियावर आलिया आणि रणबीर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पत्नीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद अभिनेत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. एवढंच नाही तर, आलिया हिला पुरस्कार मिळातानाचा क्षण रणबीर याने स्वतःच्या कॅमेऱ्यात कैद केला.
फक्त रणबीर कपूर नाही, तर आलिया हिच्या सासू आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी देखील सूनेचं कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रामवर आलिया हिच्या व्हिडीओ पोस्ट करत नीतू कपूर म्हणाल्या, ‘मला तुझ्यावर खूप – खूप गर्व आहे. देव तुला असेच आशीर्वाद देवो…’ सध्या सर्वत्र आलिया हिची चर्चा रंगली आहे.