बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील यांचंं काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. इमारतीवरुन उडी मारुन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब चर्चेत आहे. पण सध्या मलायका अरोराची बहीण अमृता हिची देखील सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. अमृता अरोराने तिच्या करिअरची सुरुवात ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून केली होती. ‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटातून अमृताला खूप प्रसिद्धी मिळाली होती. पण तिचे करिअर इतके यशस्वी ठरले नाही. पण तिच्या लव्हस्टोरीने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता.
अमृता अरोराला तिच्या करिअरमध्ये यश मिळू शकले नाही. अनेक फ्लॉप चित्रपटांमुळे तिची कारकीर्द संपुष्टात आली. ती बॉलिवूड इंडस्ट्रीत फ्लॉप ठरली. पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली. शकील लडाकसोबत तिचे नाव जोडले गेले.
शकील हा कंस्ट्रक्शन कंपनीचा डायरेक्टर आणि अमृताची मैत्रिण निशा हिचा नवरा होता. रिपोर्ट्सनुसार, शकील आणि अमृता यांच्यातील अफेअर येथूनच सुरू झाले होते. काही वर्षांनी शकीलने पत्नी निशा हिला घटस्फोट देऊन अमृताशी लग्न केले. यामुळे निशाने अमृतावर घर फोडल्याचा आरोपही केला होता.
अमृताचा उल्लेख तिच्या अभिनयापेक्षा तिच्या अफेअरबद्दल जास्त केला जातो. 31 जानेवारी 1981 रोजी जन्मलेल्या अमृताने 2003 मध्ये 22 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. ती आधी व्हिडिओ जॉकी म्हणून काम करत होती. 2004 मध्ये इंग्लंड संघाचा क्रिकेटर उस्मान अफझलसोबत तिचे नाव जोडले गेल्याने ती चर्चेत आली होती. त्यावेळी उस्मान इंग्लंड संघासोबत भारतात आला होता आणि तो अमृता अरोराच्या प्रेमात पडला होता. पण 2006 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.
2008 मध्ये एका मुलाखतीत अमृताने स्वतः सांगितले होते की, तिचे उस्मानवर प्रेम होते. उस्मानमुळेच क्रिकेट माझे दुसरे प्रेम बनले होते. 2009 मध्ये अमृताने तिचा कॉलेज फ्रेंड शकील लडाकशी लग्न केले, जो एक मोठा उद्योगपती आहे. शकीलचे आधी निशासोबत लग्न झाले होते, पण अमृता अरोरासोबत जवळीक वाढल्यानंतर त्याने ते नाते संपुष्टात आणले.
पण सध्या अमृता आणि मलायका अरोरा या दोघीही वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर चर्चेचा विषय बनल्या आहेत. खरे तर काही दिवसांपूर्वीच वडिलांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी आली होती. तेव्हापासून अमृत आणि मलायका दोघेही लाइमलाइटमध्ये दिसत आहेत.