मुंबई : चंकी पांडेची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच आता अनन्या पांडे हिने धनत्रयोदशीला मोठी खरेदी केलीये. अनन्या पांडे हिने नुकताच आता मोठी घोषणा केलीये. अनन्या पांडे हिने आलिशान घर खरेदी केले. विशेष म्हणजे अनन्या पांडे हिने म्हटले की, स्वत: च्या मालकीचे घर. अनन्या पांडे हिने या घराची खास झलक देखील दाखवली आहे. अनन्या पांडे हिने आज तिच्या नव्या घरात पूजा केल्याचे फोटोंवरून दिसत आहे.
अनन्या पांडे हिने एक पूजेचा फोटो आणि एक घरात नारळ फोडून प्रवेश करत असतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. अनन्या पांडे यावेळी जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. मात्र, अनन्या पांडे हिने हे घर नेमके कुठे खरेदी केले हे अजून कळू शकले नाहीये. अनन्या पांडे हिच्या या घराची किंमत कोट्यावधी रूपये असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
अनन्या पांडे हिने ही पोस्ट शेअर करत खास कॅप्शन देखील शेअर केले आहे. अनन्या पांडे हिने लिहिले की, माझे स्वतःचे नवीन घर…लोकांच्या प्रेमामुळे आणि प्रार्थनांमुळे हे नक्कीच शक्य झाले आहे. एक नवीन सुरुवात, सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा….आता अनन्या पांडे हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
अनन्या पांडे हिच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करत तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. काही दिवसांपासून अनन्या पांडे ही सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. अनन्या पांडे ही अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत आहे. विशेष म्हणजे यांचे काही फोटोही व्हायरल झाले. मात्र, यांनी अजूनही त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाही.
अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, अनन्या पांडे हिच्या लाईगर या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. परिणामी हा चित्रपट फ्लाॅप गेला. अनन्या पांडे हिच्यासोबत लाईगर या चित्रपटात विजय देवरकोंडा हा मुख्य भूमिकेत दिसला. मात्र, या जोडीला धमाका करण्यात अपयश मिळाले. अनन्या पांडे हिच्यावरच लाईगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर फोडण्यात आले.