अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाहीतर, दोघे अनेकदा परदेशात फिरायला देखील गेले आहेत. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरु होत्या, पण आता आदित्य आणि अनन्या यांच्या ब्रेकअपची माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनन्या – आदित्या यांच्या ब्रेअकपची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, अनन्या हिने एक क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री स्वतःच्या भावना व्यक्त करत म्हणाली, ‘जर तो तुमचा असेल तर तुम्हाला नक्की भेटेल… तुमच्याकडे पुन्हा येईल. धडा शिकवण्यासाठी त्याने तुम्हाला सोडलं आहे. जर तो खरंच तुमचा असेल, तर तुमच्याकडे परत येईल. तुम्ही त्याला स्वतःपासून दूर केलं असेल तरी तो परत येईल… काही गोष्टी प्रचंड सुंदर असतात पण त्या तुमच्या नसतात….’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
अनन्या पांडे हिची सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर अभिनेत्री आणि आदित्य यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. खरं काय आणि खोटं काय फक्त अनन्या आणि आदित्य यांनाच माहिती आहे. पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा दोघे एकत्र सुट्टी घालवताना दिसले.
अनन्या पांडे कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनन्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.