Jasmin Bhasin On Intimate Scenes: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. जास्मिन आता मालिकांमध्ये नाही तर, सिनेमामध्ये अधिक सक्रिय असते. पंजाबी सिनेविश्वात जास्मिन भसीन हिचं नाव फार मोठं आहे. पंजाबी सिनेविश्वाला अभिनेत्रीने अनेक हीट सिनेमे देखील दिले आहेत. आता अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्म येण्याची तयारी करत आहे. अभिनेत्रीच्या अटी पूर्ण झाल्यानंतर जास्मिन ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील दिसेल. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री इंटिमेट सीनवर मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत जास्मिन हिला इंटिमेट सीनबद्दल विचार आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या अटी पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार नाही… माझ्या अटी पूर्ण झाल्यानंतर मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करेल आणि दमदार अभिनय करेल…’ असं अभिनेत्री म्हणाली.
पुढे जास्मिन म्हणाली, ‘माझ्या काही मर्यादा आहेत आणि मला त्या ओलांडायच्या नाही. ओटीटीवर मला काहीतरी दमदार करायचं आहे. पण त्यासाठी मला माझी मर्यादा ओलांडायची नाही. मला असं काही करायचं आहे जे पाहिल्यानंतर माझ्या आई – वडिलांना लाज वाटणार नाही. ते मला स्क्रिनवर पाहत असतील तर, त्यांना मला सहज पाहता यायला हवं… मला असं वाटतं आपल्या भूमिकांबद्दल आपल्याला काळजी घ्यायला हवी…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
जास्मिन हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘बिग बॉस’नंतर जास्मिन अभिनेता अली गोनी याला डेट करत आहे. दोघांच्या नात्याला अनेक वर्ष झाली आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील दोघे एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात.
चाहते अली गोनी आणि जास्मिन यांना लग्नाबद्दल देखील विचारत असतात. सांगायचं झालं तर, जास्मिन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.