मुंबई : शहनाझ गिल… (shehnaaz kaur gill) जिच्यामुळं बिग बॉसचा 13 वा ( big boss 13) सिझन सर्वाधिक गाजला. जिच्या बोलण्याने सलमान खानला भूरळ घातली, खळखळून हसवलं त्या शहनाझ गिलचा आज 29 वाढदिवस. शहजनाझच्या वाढदिवसनिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
पंजाबी अभिनेत्री आणि सिंगर
शहनाझ ही मूळची पंजाबची. तिने 2015 मध्ये ‘शिव दी किताब’ या म्युझीक व्हीडिओमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. तिने काही पंजाबी गाणी गायली देखील आहेत. तिने अनेक म्युझीक व्हीडिओमध्ये अभिनयही केला आहे. ‘संत श्री अकाल इंग्लंड’, ‘काला शहा काला’, ‘डाका’, ‘होंसला रख’, या पंजाबी चित्रपटात तिने काम केलं आहे.
पंजाबची कटरिना कैफ
बिग बॉस 13 च्या घरात जेव्हा शहनाझने एण्ट्री केली तेव्हापासूनच ती चर्चेत होती. घरात जाताच तिने सलमानला सांगितलं की, ‘मुझे पंजाब की कतरिना कैफ बोलते है!’ त्यावर एकच हश्या पिकला. त्यावर सलमानने विचारलं की ‘का?’ तर म्हणाली ‘मैं मोटी हूँ ना इसलिये…’ आणि आणखी जोरात हास्याचे फवारे उडाले.
बिग बॉस 13 ची स्पर्धक
बिग बॉसने शहनाझला ओळख दिली. तिला नाव दिलं. तिच्या अभिनयायोबतच तिच्या व्यक्तीमत्वावर प्रेम करणारा चाहता वर्ग दिला. बिग बॉस 13 मधली शहनाझ तगडी स्पर्धक होती. तिच्या अभिनयामुळे तिने सर्वांचीच मनं जिंकली. ती ज्या पद्धतीने बिग बॉसचा खेळ खेळायची तेही अनेकांना भावलं. ती बिग बॉसच्या टॉप 3 मध्ये होती. घरातील स्पर्धकांविषयी बोलताना बिग बॉस स्वत: म्हणाले होते की, ‘जेव्हा जेव्हा बिग बॉस 13 च्या विषयी बोललं जाईल तेव्हा तेव्हा शहनाझ गिल हे नाव घेतलं जाईल.’
सिद्धार्थ शुक्लासोबतची मैत्री
शहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी ‘मैत्री’ या शब्दाचा अर्थ अधिक खुलेपणाने सगळ्यांसमोर आणला. बिग बॉसच्या घरात काय घडतंय तितकीच किंबहुना त्याहून अधिक चर्चा या दोघांच्या मैत्रीची होती. शहनाझचं छोट्या-छोट्या गोष्टीवरून रुसणं आणि सिद्धार्थचं तिला मनवणं हे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड भावलं. या दोघांची मैत्री बिग बॉसच्या घराबाहेरही टिकली. या दोघांनी एकमेकांसोबत काही गाणी केली. काही जाहिराती करताना हे दोघे दिसले. रिअॅलिटी शोमध्ये देखील या दोघांनी सोबत हजेरी लावली.
सिद्धार्थच्या जाण्यानंतर खंबीर उभी राहणारी शहनाझ
नुकतंच सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं. त्याच्या जाण्यानंतर शहनाझला मोठा धक्का बसला. ती अनेक दिवस सोशल मीडियापासून अलिप्त होती. सिद्धार्थाच्या जाण्यानंतर तिने पहिली पोस्ट केली ती सिद्धार्थसाठी तयार केलेल्या गाण्याची. आता शहनाझ या धक्क्यातून हळूहळू सावरताना दिसतेय. काही जाहिराती तिने केल्या. तसंच नवीन फोटोशूटही तिने केलं आहे.
संबंधित बातम्या