अभिनेत्रा कंगना रनौत आणि खसदार कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या वादग्रस्त कारणामुळे चर्चेत असते. गुरुवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका महिला कॉन्स्टेबलने चंदीगड विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावली आणि शिवीगाळ देखील केली. या घटनेनंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. ज्यामुळे सध्या वातावरण तापलं आहे. आता कंगना हिने स्वतःसोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर कंगना हिच्यावर झालेल्या हल्ल्याचा विरोध करण्यात येत आहे. पण अद्याप सिनेविश्वातून कोणीच अभिनेत्रीच्या बाजूने उभं राहिलेलं नाही. ज्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली. पण अभिनेत्रीने पोस्ट डिलिट देखील केली आहे.
बॉलिवूडवर संताप व्यक्त करत म्हणाली, ‘प्रिय फिल्म इंडस्ट्री, तुम्ही सर्वजण विमानतळावर माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा आनंद साजरा करत आहात, किंवा मग तुम्ही मौन बाळगलं आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उद्या जर तुम्ही आपल्या देशात कोणत्या रस्त्यावर चालत आहात आणि तेव्हा कोणी इस्रायली/पॅलेस्टिनी तुमच्यावर किंवा तुमच्या मुलावर हल्ला करतात… कारण तुम्ही राफासाठी उभे आहात…
मग तुम्हाला दिसेल की मी तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढणार… ‘ऑल आइज ऑन राफा’ हे तुमच्या मुलांसोबत देखील होऊ शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आनंद साजरा करताय, तर त्या दिवसासाठी तयार राहा… जेव्हा तुमच्यासोबत देखील हे सगळं होऊ शकतं… असं देखील अभिनेत्री म्हणाली.
दरम्यान, महिला कॉन्स्टेबलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ 2020 मधील आहे. जेव्हा कंगना शेतकरी आंदोलनासाठी आक्रमक झाली होती. अभिनेत्री म्हणाली होती, ‘शेतकरी आंदोलनात आंदोलन करणाऱ्या महिलांना 100-200 रुपये दिले जातात… त्या आंदोलनात महिला कॉन्स्टेबलच्या आई देखील होत्या. सध्या संबंधीत प्रकरणी सर्वत्र चर्चा होत आहे.
विमानतळावर घडलेल्या घटनेनंतर कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली “दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने माझ्या कामशिलात लगावली आणि मला शिवीगाळ केली. मी कारण विचारल्यानंतर ती म्हणाली, तिने मला ती शेतकरी आंदोलनाची समर्थक असल्याचं सांगितलं.’ सध्या सर्वत्र कंगना हिची चर्चा रंगली आहे.