मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) तिच्या सिनेमांतल्या भूमिकांसाठी ओळखली जाते. पण अनुष्काचं एक प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे. ‘क्लिन स्लेट फिल्म्स’ (VClean Slate Filmz) या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून अनुष्का काही सिनेमे प्रोड्यूसदेखील करते. आता या प्रॉडक्शन हाऊसने अॅमेझॉन (amazon) आणि नेटफ्लिक्ससोबत (netflix) एक करार केला आहे. ज्याची किंमत 400 कोटी इतकी आहे.
दीड वर्षात 8 सिनेमे
‘क्लिन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसने केलेल्या करारानुसार येत्या दीड वर्षात 8 सिनेमे आणि काही वेब सिरीज या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जाणार आहेत. नेटफ्लिक्सने या संदर्भातल्या येत्या तीन प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे तर अॅमेझॉनने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
क्लिन स्लेट फिल्म्स
अनुष्का क्लिन स्लेट फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून काही सिनेमे प्रोड्यूस करते. 2015 ला या प्रॉडक्शन हाऊसने पहिला सिनेमा आणला ज्याचं नाव आहे एनएच 10. या चित्रपटात अनुष्काने स्वत: चित्रपटातील नायिकेची भूमिका साकारली होती.
फिल्लोरी आणि परी या चित्रपटांची निर्मिती देखील याच प्रॉडक्शन हाऊसने केली होती. त्यामुळे अभिनेत्री म्हणून अनुष्काचं कामं प्रेक्षकांना आवडलं. तसंच तिची निर्मिती असलेल्या सिनेमांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या